पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सगळे वैतागलेले असताना या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेदेशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपये व डिझेल वरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांची कपात केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 9.50 रुपये तर डिझेल सात रुपयाने स्वस्त झाले असून हे दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.
या करकपात याची माहितीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. आता या नवीन करारानुसार दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोल 105.41 रुपया ऐवजी आता 95.91 रुपयांना मिळेल तर डिझेल 96.67 रुपया ऐवजी आता 89.67 रुपयांना मिळेल. चालू परिस्थितीत सरकार पेट्रोलवर 27.90 व डिझेलवर 21.80 रुपयांचे उत्पादन शुल्क वसूल करते. आता या कपाती नंतर पेट्रोल वर 19.90 व डिझेलवर 15.80 त्यांचे उत्पादन शुल्क राहील यामुळे संपूर्ण देशात पेट्रोल साडेनऊ तर डिझेल सात रुपये प्रति लिटर ने स्वस्त होईल.
आनंदाची बातमी : तीन वर्षात साखर निर्यातीमध्ये १५ पट वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यांना महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात करण्याचा सल्ला दिला होता. पण त्याला महाराष्ट्रासह अन्य कोणत्याही राज्याने सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आता स्वतः केंद्राने ज्या करकपात द्वारे जनतेला दिलासा दिला आहे. गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे झालेली बिकट अवस्था, रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
अतिमहत्वाची बातमी : सोयाबीनच्या नव्या या सहा वाणांचे संशोधन
सिलेंडर वर दोनशे रुपये सबसिडी : केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की सरकारने उज्वला योजनेतील गॅस सिलेंडर वर या वर्षी दोनशे रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला वर्षाकाठी बारा सिलिंडर मिळतील व याचा फायदा देशातील नऊ कोटी कुटुंबांना मिळेल. तसं यासोबत प्लास्टिक उत्पादनांच्या कच्च्या मालावरील उत्पादन शुल्क ही कमी करण्यात येईल. ज्या ठिकाणी आयातीवर आपले अवलंबित्व जास्त आहे. तसेच काही स्टील उत्पादनांच्या कच्चा मालावरील आयात शुल्क कमी केले जाईल.
आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये इतका वाढविला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील 18 रुपये 24 पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.
लक्षवेधी बातमी : भीमा नदीकाठीच्या१३१ गावात होणार शेती सेंद्रियचे प्रबोधन
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1