प्रत्येक वर्षी ऐन हंगामात खताचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होतात. ही समस्या होवू नये यासाठी युरिया व डीएपी खताच्या संरक्षित साठा करून ठेवण्यासंदर्भात कृषीमंत्र दादा भुसे यांनी खास बैठक घेतली यावेळी त्यांनी रब्बी आणि खरीप 2022-23 या पुढील दोन्ही हंगामात खताचा तुटवडा भासू देवू नका यासाठी नियोजन करा, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुराव करून नियोजन करावे, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या.
मंगळवारी मंत्रालयात युरिया व डीएपी खताच्या संरक्षित साठा (Buffer Stock) करुन ठेवण्याबाबत गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, (ऑनलाईन उपस्थित) कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
आजपासून तीन दिवस या जिल्ह्यात पडणार पाऊस हवामान खात्याचा अंदाज
विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात : आदित्य ठाकरे
श्री दत्त कारखान्यात झाले शुगर बीटचे गाळप !
जीआय मिळालेल्या फळामधील वाढत्या बनवेगिरीला आळा घालणार ?
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत झाली कमालीची वाढ
कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यात खतांची उपलब्धता व वितरण यावर नियंत्रण ठेवणे व वाटपाच्या नियोजनात सुसूत्रता असणे आवश्यक आहे. येत्या खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये. शेतकऱ्यांना वेळेत खत पुरवठा व्हावा यासाठी पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन नियोजन करावे, असे कृषी मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇