अंजीर उत्पादनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन !

0
1062

आरोग्यासाठी चांगले असलेल्या अंजीर पिकाची लागवड वरचेवर वाढत आहे. याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास अंजीर लागवडीतून चांगले उत्पादन मिळू शकते. महाराष्ट्रातील हवामान या फळपिकासाठी योग्य असून, आता लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. त्याबरोबरच याची उत्पादकता वाढविण्यासाठी नव्या तंत्राचा वापर केल्यास नक्कीच नक्कीच यशस्वीपेणे अंजीर लागवड करता येते.

अंजीराला समशीतोष्ण हवामान लागते, अति थंडी किंवा अति उष्णता याला मानवत नाही, सरासरी 500 ते 750 मिमी पाऊस योग्य, प्रामुख्याने कोरडे व निमकोरडे हवामान उत्तम, विश्रांतीच्या काळात 12 अंश सेंल्सिअस पर्यंत तापमान सहन करते. वाढते तापमान, कोरडी हवा व फळे पिकण्याच्या काळात पावसाचा अभाव या गोष्टी महत्त्वाच्या तर हवेत जास्त दमटपणा व थंडी असली तर फळे फाटतात. तापमान जास्त वाढले तर फळे अकाली पिकतात व चिवट बनतात. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील हवामान लागवडीस पोषक तर जास्त पावसाच्या प्रदेशात (नांदेड, परभणी) लागवड टाळावी. अंजीर अवर्षणास प्रतिकारक आहे.

जमीन : सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. मध्यम ते भारी व चुन्याचे प्रमाण कमी असणारी, तसेच ओल टिकवून ठेवाणारी परंतु उत्तम निचर्‍याची तीन ते चार फुटावर मुरूम असलेली जमीन चांगली असते.

जाती : दिनकर, दौलताबाद, पुना, अंजीर, एक्सेल, दियन्ना, कोनाद्रीया, नादींया इत्यादी जाती असून याची अभिवृद्धी गुटी किंवा छाट कलम, खुंट कलम व बाजू कलम,

लागवड : पाच बाय पाच मीटर अंतरावर हेक्टरी एकूण 400 झाडे तर 4.5 बाय 3.0 मीटर अंतरावर हेक्टरी 740 झाडे बसतात. यासाठी 0.6 बाय 0.6 बाय 0.6 मीटर आकाराचे खड्डे तळाशी पालापाचोळा, भुसा, 1 किलो स्फुरद, दोन घमेली शेणखत, 100 ग्रॅम कार्बोरील, माती भरून द्यावी व त्यात पावसाळ्यात लागवड करावी, पाणी द्यावे.

वळण : पहिल्या वर्षे एक मीटर उंची वाढल्यावर शेेंडा खुडावा व त्यावर तीन मुख्य फांद्या वाढवाव्या व बगल फूट वेळोवेळी काढावी. त्यानंतर चार ते पाच फांद्या ठेवाव्यात. प्रत्येक झाडास दोन ते तीन खोडे ठेवावीत. दोन मुख्य फांद्यातील अंतर 15 सें.मी. ठेवावे. पहिली दोन ते तीन वर्षे झाडावर फळे घेऊ नयेत. अधिक डोळे फुटण्यासाठी छाटणीनंतर लगेच 500 पी.पी. एम. इथ्रेल या संजीवकाचा फवारा द्यावा. पूर्ण वाढीच्या झाडाची छाटणी जून किंवा सप्टेंबरमध्ये करावी. तसेच डोळे फुटण्यासाठी अ, आकाराच्या खाचा डोळ्याच्या वर पाडाव्यात. फळे पिकण्यासाठी शेणखत जास्त द्यावे व वेळोवेळी हलके टाचण करावे.

खते : अंजीराच्या झाडास पहिल्या वर्षी दहा किलो शेणखत 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद, 50 ग्रॅम पालाश प्रत्येक झाडास द्यावे. पूर्ण वाळलेल्या झाडास प्रत्येकी 40 किलो शेणखत 600 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद, 300 ग्रॅम पालाश द्यावे. संपूर्ण शेणखत, अर्धे नत्र, पूर्ण स्फुरद व पालाश सप्टेंबरमध्ये व उरलेले अर्धे नत्र नोव्हेंबरमध्ये द्यावे.

एकात्मिक खत व्यवस्थापन : महात्मा फुले कृषी विद्यालय राहुरी येथील प्रक्षेत्रावरील संशोधनावरून ) पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत 50 किलो अधिक 975 ग्रॅम नत्र अधिक 250 स्फुरद अधिक 275 ग्रॅम पालाश अधिक सुक्ष्मअन्नद्रव्ये 100 ग्रॅम अधिक निंबोळी पेंड एक किलो अधिक बायोमील 500 ग्रॅम या प्रमाणे छाटणीनंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर पहिला हप्ता व दुसरा हप्ता 10:26:26 ते 500 ग्रॅम फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात द्यावा.

पाणी व्यवस्थापन : ठिबक सिंचन पद्धतीने 10:20:40 टक्के डब्लु.ए. अंजीरांचा जुलै ते ऑगस्ट हा विश्रांतीचा काळ असतो. म्हणून पाऊस नसला तरी पाणी देण्याची गरज नाही. पण ऑक्टोबर ते मेपर्यंत नियमित पाणी द्यावे लागते. फळे वाढण्याच्या काळात पाणी कमी पडू देवू नये, तसेच बेचव लागतात. तसेच फळे तडकतात. हिवाळ्यात दहा दिवासाचे अंतराने तर उन्हाळ्यात सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

आंतरपिके : दोन ते तीन वर्षे भाजीपाला व कडधान्याची पिके घ्यावीत. बाग स्वच्छ ठेवावी.

छाटणी व खाचा पाडणे : छाटणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान करावी. फांद्यावरील डोळे फुटण्यासाठी अ, आकाराच्या खाचा डोळ्याच्यावर पाडाव्यात. खाच पडल्याने डोळ्याला कर्बेयुक्त पदार्थाचा अधिक पुरवठा होऊन फळाची प्रत सुधारते. खाचा देण्याचे काम ऑगस्ट ते सप्टेंबर किंवा जानेवारी महिन्यात करावे. अत्यंत तीक्ष्ण चाकूने साल काढावी. मात्र साल काढल्याबरोबर जो दुधासारखा चीक बाहेर पडतो तो डोळ्यावर ओघळून साठणार नाही याची काळजी घ्यावी. फांदीच्या मध्यभागी असलेले डोळे या कामासाठी फार सोईचे असतात. तसेच एका फांदीवर दोनाहून अधिक डोळ्यावरील साल काढू नये. हे काम फारच किचवट असते.

बहार धरणे : आपणाकडे अंजीरास दोन बहार येतात. उन्हाळ्यातील मिठा बहार व पावसाळ्यातील खट्टा बहार, आपल्याकडे मिठा बहार धरावा. ह्या बहाराची फळे ऑक्टोबरमध्ये लागतात. मार्च ते एप्रिलमध्ये काढणीस येतात. खड्ड्या बहाराची फळे बेचव असतात. मात्र त्यापासून जेली चांगली तयार करता येते. मिठा बहार धरण्याकरिता सप्टेंबरमध्ये नांगरणी, वरवरणी करून पाणी द्यावे.

पीकसंरक्षण : साल व खोड अळीच्या बंदोबस्तासाठी जाळ्या काढून नुवाक्रॉन फवाराने. खोड अळीच्या बंदोबस्तासाठी चार किलो गेरू (24 तास भिजवावा) अधिक दहा लिटर पाणी अधिक दहा लिटर पाणी अधिक 25 इ.सी. लिंडेन, 25 मिली किंवा 50 मिली. क्लोरोपायरीफॉस अधिक ब्लायटॉक्स 25 ग्रॅम मिश्रण एकजीव करावे व सदरील पेस्ट जमिनीपासून दोन ते तीन वरपर्यंत बुंध्यावर लावावी. झाडाच्या फांद्या सुकत असतील तर दहा मिली नुऑन एक लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे फांद्या तीन आठवड्यात पूर्ववत होतील. खोड किडीच्या छिद्रात कडक तार घालून अळीचा नाश करावा व त्यामध्ये पेट्रोल/रॉकेल सोडून छिद्र बंद करून घ्यावे. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पाने वेचून बाग स्वच्छ ठेवा पावसाळ्यात झाडावर 0.6 टक्के बोर्डोचे द्रावण फवारावे. पक्षी नियंत्रणासाठी शेडनेटचा मांडव टाकल्यास फळांचा पक्षापासून बचाव होतो.

निर्यात : जगभर मागणी आहे. सुकी फळे व जेली, आशियाई देश व युरोप, विशेषकरून आखाती देशामध्ये सुक्या अंजीराना मागणी जास्त आहे.

उत्पादन व काढणी : ताजी फळे फक्त दोन दिवस चांगली राहतात व काढल्यानंतर मुंबई बाजारपेठेत 100 ते 110 रूपये प्रति किलो कच्च्या अंजीराचा भाव मिळतो. एका झाडापासून 25 ते 30 किलो ताजी फळे मिळतात. दूरवरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी अर्धवट पिकलेली फळे काढावीत. एका हेक्टरमध्ये 10 ते 12 टन तर एक किलो पासून 300 ग्रॅम सुके अंजीर मिळतात. अंजिराची ताजी फळे टोपलीत अंजीराच्या पानामध्येच पॅकिंग करून बाजारात पाठवावीत. शीतगृहात तापमान 32 ते 35 फॅरनहाईट व 85 ते 90 टक्के आठवडे फळे साठवता येतात.

डॉ. भगवान घोडकी, डॉ. बी. ए. कदम वसंतरान नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here