भारतातील सर्व उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय आणि उष्ण समशीतोष्ण प्रदेशात भेंडीची लागवड करण्यात येते. भेंडीच्या शेंगा हा अपरिपक्व खाद्यपदार्थाचा समृद्ध स्रोत आहे. जीवनसत्त्वे अ आणि ब आणि कॅल्शियम, फॉस्फरस आणि खनिजे, लोह याबरोबरच हा आयोडीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. शिवाय, त्याचे म्युसिलेज विशिष्ट वैद्यकीय आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी योग्य आहे.
महत्त्वाची माहिती : भेंडीवरील या 2 रोगाचे असे करा नियंत्रण
जमीन : भेंडी पिकाची लागवड विविध जमिनीत करतात. परंतु चांगल्या पोषणसाठी मध्यम भारी ते काळी कसदार जमीन त्याचप्रमाणे वालुकामय चिकणमाती उपयुक्त ठरते. उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन, हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा. चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी. जमिनीचा सामू 6.0 ते 6.5 पर्यंत असावा पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.
हवामान : भेंडी हे उष्णकटिबंधीय पीक आहे. उगवण, वाढ आणि फळधारणेसाठी तापमान 25 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान गरजेचे असते. वनस्पतीला उबदार हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. हे वेगवेगळ्या मातीच्या स्थितीत चांगले वाढते. उगवणीवर 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा परिणाम होतो.
भेंडी लागवडीसाठी जातींची निवड
1. फुले उत्कर्षा : ही जात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथून विकसित केलेली असून फळे हिरव्या रंगाची,पाचधारी चमक, कोवळी व् चमकदार आणि उन्हाळी लागवडी साठी आहे.
2. फुले विमुक्ता : ही जात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथून विकसित केलेली असून आकर्षक चमकदार हिरव्या रंगाची फळे विषाणुजन्य हल्दया रोगास पूर्ण प्रतिबंधक त्याचप्रमाणे चांगले उत्पादन 200 – 210 क्विंटल / हे एवढे आहे.
फायद्याच्या टिप्स : भेंडीवरील किडींचे असे करा एकात्मिक व्यवस्थापन
3. परभणी क्रांती : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथून विकसित केलेली जात. फळे 7 – 10 सेमी लांब हिरवी पुसा सावनी पेक्षा कणखर व व्हायरस रोगास प्रतिकारक,फळे नाजूक तजेलदार हिरवी. पेरणी पासून 55 दिवसात पहिला तोडा सुरु होतो. उन्हाळ्यात 14 – 16 तोडे तर खरिपात 20 तोडे होतात.
4. अर्का अनामिका : झाड उंच फळे लांब कोवळी हिरवी, फळाचा देठ लांब. व्हायरस रोगास प्रतिकारक. व्हेक्टरी 9 -12 टन उत्पादन. त्याशिवाय राधिका, महिको – 10, महिको हाइब्रिड – 1, अंकुर, रिद्धिमा, रश्मी, अजित – उन्नति, अजित – 151, रोहिणी (निजिवुडू) या खाजगी कंपनीच्या जाती बाजारात उपलब्ध आहेत.
लागवड : भेंडीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. खरीपासाठी बियांची पेरणी मे – जून महिन्यात करावी. लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर करावी. दोन ओळीतील अंतर 45 -65 व दोन रोपांतील अंतर 30 – 45 सेमी ठेवावे. खरीपासाठी 12 – 15 किलो बियाणे लागते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हवामानानुसार 5 – 8 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. लागवडीच्या सुरुवातीस बियाने उगवण चांगली होण्याकरीता जमिनीत योग्य ओलावा असणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे : जाणून घ्या टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान !
खत व्यवस्थापन : सेंद्रिय खतामध्ये शेणखत – कंपोस्ट 15 ते 20 टन / हेक्टर द्यावे. जीवाणु खते देतना 50 किलो शेणखत मिसळून 2 किलो / हेक्टर अझोस्पिरिलम आणि 2 किलो / हेक्टर फॉस्फोबॅक्टेरियाचा वापर करावा. रासायनिक खते 100 : 50 : 50 नत्र, स्पूरद अणि पालाश किलो / हेक्टर अर्धे नत्र, संपूर्ण स्पूरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित 50 किलो नत्र पेरणी नंतर तीन समान हप्त्यांत विभागून 30 : 45 : 60 दिवसांनी द्यावे.
आंतर मशागत : भेंडी पिकमध्ये सुरुवातीस 20 ते 25 दिवसांनी खुरपणी करावी. लागवडीपासून एक महिन्यांनी वर ख़तच्या मात्रा द्या.
पाणी व्यवस्थापन : उगवण चांगली होण्यासाठी बियाणे पेरल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उन्हाळ्यात पिकाला 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फळांच्या स्थापनेच्या टप्प्यावर ओलाव्याचा ताण फळांचा दर्जा आणि उत्पादन कमी करतो. साधारणपणे ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून पिकाला पाणी व्यवस्थापन करावे. वेत व झाडाला भर द्यावा.
भेंडी पिकावरील रोग व्यवस्थापन तंत्र
1. भुरी रोग : पानांवर पांढर्या राखाडी रंगाची पावडर मायसेलियल वाढ पानांच्या खालच्या आणि वरच्या पृष्ठभागावर होते. हा डाग नंतर पसरत जाऊन संपूर्ण पानावर पावडर पसरल्यासारखे दिसते. कोरडे आणि उबदार हवामान रोगाच्या विकासास अनुकूल करते. पाने सुकून गळून पडतात आणि फळे लागत नाहीत. भुरी रोगच्या नियंत्रणासाठी सल्फर 80 % डब्लू पी 30 ग्रम प्रति 10 लीटर पाण्यातून फवारणी रोगाची लक्षणे दिसताच करावी 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त दिसू लागल्यास हेक्झकोनाझॉल (कॉन्टटाफ) 0.5 मिली प्रती लिटर ह्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
महत्त्वाची माहिती : वांग्यावरील रोगाचे सोप्या पद्धतीने करा; असे नियंत्रण
2. केवड़ा : हा विषाणूजन्य रोग असून, त्यास येलो व्हेन मोझॅक म्हणतात. रोगट झाडाच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात पानांचा इतर भाग पिवळसर हिरवा दिसतो. फलधारणा झाल्यानंतर ती पिवळी दिसते. गंभीर अवस्थेत, संक्रमित पाने पूर्णपणे पिवळी किंवा सपाट रंगाची होतात. संक्रमित झाडे खुंटलेली राहतात. केवड़ा रोगच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे काढून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचे वेळीच नियंत्रण करावे. या साठी इमिडाक्लोरोप्रिड 17.5 ई. सी. 2 मिली प्रति लिटर किंवा लैम्डा सायलोथ्रिन 2.5 ई.सी 2 मिली प्रति लिटर या पैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
भेंडी पिकावरील किडी व्यवस्थापन तंत्र
1. पांढरी माशी : या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषतात. झाडाची वाढ खुंटते व भेंडी लागत नाही. पाने अर्धवट पिवळे होतात. या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोरोप्रिड 17.5 ई.सी 2 मिली प्रति लिटर कीटकनाशकाची फवारणी करावी. या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसू लागल्यास एसीटोमिप्रिड (प्राईड) 20 एस पी 0.5 ग्रॅम प्रति लिटर फवारावे. निंबोळी तेल आलटून पालटून फवारावे.
2. फळे पोखरणारी अळी : किडकी फळे मातीत पूरावित. फवारणीसाठी डेल्टा मेथ्रिन 2.8 ई. सी. 8 मिली किंव्हा क्विनॉलफॉस 25 ई. सी. 16 मिली 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भेंडी पिकाची काढणी व उत्पादन : पेरणी नंतर साधारणपणे 40 ते 50 दिवसात फुले लागण्यास सुरुवात होते व त्यानंतर 6 ते 8 दिवसात फळे तोडणीस तयार होतात. लहन कोवळ्या फळांची तोडणी 2 ते 3 दिवसाच्या अंतराने करावी. तोडणीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केलेल्या भेंडी हार्वेस्टचा वापर करावा. निर्यातीसाठी 5 ते 7 सेमी लांब कोवळी एकसारखी फळाची तोडणी करावी. काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी. उत्पादन हेक्टरी 15 ते 20 टन एवढे मिळते.
प्रा. अमोल भुकन, प्रा. वैभव कापडनिस, प्रा. शितल कुंभार (सह्या. प्राध्यापक, भाजीपाला विभाग) उद्यानविद्या महाविद्यालय, मालेगाव जि. नाशिक.
ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1