यंदा तापमानात झालेले वाढ, उन्हाचा ताडाका आणि लांबलेला मान्सून याचा मोठा परिणाम डाळिंबाच्या मृग बहरावर झाला आहे. मृग बहरातील डाळिंब फुलाचे नैसर्गिक सेटिंग होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे यंदाच्या मृग बहरातील डाळिंब उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता डाळिंब उत्पादकांमधून व्यक्त होत आहे.
मोठी बातमी : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
डाळिंब हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. राज्यात साधारणतः 87,550 हेक्टरहून अधिक क्षेत्र डाळिंब फळपिकाखाली आहे. राज्यात सध्या सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये व्यापारी तत्त्वावर डाळिंब पिकाची उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा वातावरणातील बदलामुळे डाळिंब उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी देशात डाळिंबाचा मृग बहर 50 हजार हेक्टरवर होता. परंतु यंदा प्रतिकूल स्थितीमुळे मृग बहर कमी होण्याची स्थिती आहे. यंदा 15 हजार हेक्टरने क्षेत्र घटेल, असा प्राथमिक अंदाज डाळिंब उत्पादक संघाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. यंदा
नक्की वाचा : टोमॅटो 120 रुपये किलोवर ?
देशात आतापर्यंत सुमारे 20 ते 30 हजार हेक्टरवरील बागांमध्ये डाळिंबाचा मृग बहर धरला आहे. मात्र मॉन्सूनपूर्व पावसाची दडी आणि अति तापमान या साऱ्याचा परिणाम डाळिंबाच्या मृग बहरावर होण्यास प्रारंभ झाला आहे. परिणामी, क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. फुलकळींचे सेटिंग होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोरडवाहू पट्ट्यात कमी पाणी, पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने दर्जेदार डाळिंबाचा मृग बहर धरला जातो. अनेक भागांत उपलब्ध पाण्यावर एप्रिल मे महिन्यात आगाप मृग बहर धरण्यासाठी शेतकरी नियोजन करतात. या दरम्यान, शेतकरी बागांची हलकी छाटणी करून त्या ताणांवर सोडतात. या बागा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फुलोरावस्थेत येतात.
दरम्यान, मार्च -एप्रिल म्हणजे उन्हाळी आगाप बहर धरला आहे. या फळ छाटणी केलेल्या बागांमध्ये फुलांचे सेटिंग होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. अति तापमान असल्याने परागीभवन होत नसल्याने कळी बारीक निघत आहे. आता पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे फुलगळीची समस्या उद्भवत आहे.
देशात जूनपासून बहर धरण्याची गती वाढली जाते. मात्र पाऊस लांबल्याने उपलब्ध कमी पाण्यावर बहर कसा धरायचा, असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे. पावसाच्या आशेवर मोजक्या शेतकऱ्यांनी बहर धरला आहे.
नवी योजना : शेतकऱ्यांसाठी पीएम-प्रणाम योजनेची घोषणा
https://www.facebook.com/shetimitramagazine03