राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

0
595

गेल्या आठवड्यामध्ये अचानक तापमानात वाढ झाल्यानंतर आता राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, येणाऱ्या दोन दिवसात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील खानदेश पट्टा म्हणजेच जळगाव, धुळे आणि नंदुरबार त्यासोबतच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड तसेच त्यासोबत नाशिक जिल्ह्याला देखील वादळी वारे व गारपिटीसह पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणपूर्व अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यापासून तर थेट कोकण किनारपट्टी पर्यन्त कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पूर्व वारे आणि पश्चिमी वारे एकत्र वाहत आहेत.

परिणाम हा महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर वाऱ्याचा वेग देखील ताशी 30 ते 40 किमी या दरम्यान राहणार आहे. नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात मध्ये त्यासोबतच नाशिक, औरंगाबाद आणि बीड, जालना या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा आणि वादळी वारे तसेच गारपिटीचा फटका थेट शेतीला बसण्याची शक्यता असून मोठे नुकसान होऊ शकते.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

यामुळे होईल आठवड्यात महागाईचा भडका

शेवग्याची छाटणी करून मिळवा भरपूर शेंगा

येत्या 5 दिवसात या जिल्ह्यात पावसाचा अंदाज

अशी बनवा परसबागेलाच न्युट्रीशनल गार्डन

लाला मिरचीला विक्रमी दर ; उत्पदकता मात्र ढासळली

आज मराठवाड्यात गारपिटीचा पाऊस कोसळेल असे कुलाबा वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच मुंबई शेजारचे ठाणे, पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी धुळीचे वादळ तर काही ठिकाणी हलका पाऊस कोसळू शकतो असे हवामान खात्याने अलर्ट मध्ये म्हटले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here