Lumpy Disease PPE Kit : मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात लम्पी रोगाने (Lumpy Skin Disease) पशुपालक हैराण झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत लाखो रुपये किमतीची जनावरे या रोगामुळे दगावली आहेत. यावर मत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महूद (Mahood) (जी. सोलापूर, ता. सांगोला) येथील आदर्श पशुपालक जितेंद्र बाजारे (Jitendra Bazare) यांनी जनावरांसाठी आता पीपीई किट (PPE Kit) बनवली आहे. विशेष म्हणजे, त्याचा त्यांनी अने क गावात यशस्वी प्रयोगही केला आहे.
मोठी बातमी : कृषी उत्पादक कंपन्यांच्या संख्येची अट शिथिल करा : कृषिमंत्र्यांचे वर्ल्ड बँकेला सूचना
लम्पी रोगाचा संसर्ग थांबवण्यासाठी शासनाला गुरांचे बाजार, बैलांच्या शर्यतींवर निर्बंध आणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लम्पीचा प्रसार अजूनही कमी झालेला नाही. अशातच महूद (जी. सोलापूर, ता. सांगोला) येथील आदर्श पशुपालक जितेंद्र बाजारे यांनी जनावरांसाठी आता पीपीई किट (PPE Kit) बनवली आहे. यामुळे लम्पीचा धोका टाळून संसर्ग देखील रोखता येण्याचा दावा जितेंद्र बाजारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे अतिशय कमी किमतीत पशुधन वाचवण्यासाठी शासनाने (Govt) हा प्रयोगाचा वापर करावा असे आवाहनही बाजारे यांनी केले आहे.
या संदर्भात बोलताना बाजारे म्हणाले, जनावरांवर लम्पीचा धोका वाढू लागल्यावर याचा नीट अभ्यास (Study) करून जनावरांसाठी पीपीई किट (PPE Kit) बनविण्याचा प्रयोग केला आहे. सुरुवातीला यासाठी कॉटन कापडाचे किट बनवून पहिले. त्यानंतर 90 जीएसएम जाडीचे नॉन ओवन फॅब्रिक (non oven fabric) घेऊन त्यापासून पीपीई किट बनवले. हे किट बनविताना त्या किटला काही विशिष्ट ठिकाणी कप्पे (Pockets) केले आहेत. त्यामध्ये डांबर गोळ्या (asphalt pellets) ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
ब्रेकिंग न्यूज : यंदा 1 नोव्हेंबर पासून ऊसाचे गाळप सुरु होण्याची शक्यता
एका व्यक्तीला सहजासहजी ही किट जनावरांना घालू शकेल अशा पद्धतीने या किटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे किट असताना देखील गुरांची तपासणी, (Cattle Inspection) दूध काढणे शक्य आहे. बाजारे यांच्या गोठ्यात गेल्या 20 वर्षांपासून 55 जनावरे आहे. त्यामुळे त्यांनी या किटचा पहिला प्रयोग आपल्या गोठ्यातील जनावरांवर केली आहे. त्यानंतर बाजारे यांनी सांगोला तालुक्यातील लम्पीची साथ मोठ्या प्रमाणात असणाऱ्या लोटेवाडी, अजनाळे, माळशिरस, शंकरनगर अशा विविध गावात जाऊन या किटचा प्रयोग केला. यामुळे, लम्पीचा संसर्ग झालेले जनावरे वाचली असून, त्यांचा प्रादुर्भाव इतर जनावरांना न झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पशुधन वाचण्यास मदत झाली असल्याचे ते सांगतात.
या पीपीई किटसाठी 1300 ते 1400 रुपये खर्च येतो. यामुळे लाखो रुपयांच्या पशुधनाचे संरक्षण होत असल्याने शासनाने हे पीपीई किट वापरून लम्पी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जितेंद्र बाजारे यांनी केले आहे.
बाजारे हे महूद येथील रहिवासी असून, एक आदर्श पशुपालक देखील आहेत. ते आदर्श गोपालक पुरस्कार प्राप्त गोठ्याचे मालक असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यासमंडळाचे (Economics Institute) जितेंद्र बाजारे हे सदस्य म्हणून काम करतात. बाजारे यांचा अकलूज येथे भक्ती गारमेंट हा कपडे शिवण्याचा व्यवसाय आहे. यापूर्वी त्यांनी कोविड (Covid) काळात हजारोच्या संख्येने पीपीई किट (PPE Kits) आणि मास्क (Masks) बनवून डॉक्टरांची मदत केली आहे.
मोठी बातमी : आता माती परीक्षणासाठी कृषी विभाग घेणार पोस्ट ऑफिसची मदत
https://www.facebook.com/shetimitramagazine03