हवामानातील बदलांमुळे पर्यावरणात मोठा बदल दिसून येत आहे. शेतीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अशात यंदा मान्सूनपूर्व पावसाने दांडी मारल्याने शेतीमधील खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व कामाला विलंब होत आहे. त्यामुळे खरिप हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्रेकिंग न्यूज : आज या जिल्ह्यात वादळी पाऊस ?
यंदा मान्सून पावसाचा अंदाज चांगला असला तरी देशातील 66 जिल्ह्यात अद्याप मान्सूनपूर्व पाऊस झालेला नाही. त्यापैकी महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दांडी मारली आहे. अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी कोरड्या हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे.

भारतातील किमान 66 जिल्ह्यात अद्याप मान्सूनपूर्व पाऊस झालेला नाही. यामध्ये बहुसंख्य गुजरात (25), उत्तर प्रदेश (14) आणि महाराष्ट्रातील (11) जिल्ह्यांमध्ये 23 मेपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस झालेला नाही. परिणामी या भागांमधील शेतीच्या खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व कामे खोळंबली आहेत.
या महिन्यात प्रायद्वीप आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र मध्य भारतामध्ये आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये फारसा पाऊस झाला नाही. इतकेच नव्हे तर भारतातील जवळपास 31 % जिल्ह्यांमध्ये अजूनही मान्सूनपूर्व पावसाची कमतरता दिसून येत आहे. तर इतर 21 % जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस कमी झाला असल्याचे 23 मे पर्यंतच्या भारतीय हवामान विभागाकडील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
ब्रेकिंग : नक्की मान्सून महाराष्ट्रात कधी ?
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व कामे खोळंबली आहेत. खरीप पेरणीसाठी जमीन तयार करण्याच्या कामांना विलंब होत आहे. एकूणच मान्सूनपूर्व पावसाच्या कमतरतेमुळे खरिपाच्या तयारीला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या कमतरतेमुळे पेरणीपूर्व कामांना उशीर झाला आहे. जमीन मशागत आणि सपाटीकरण अशी कामे रखडली आहेत. कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागात माती कोरडी आहे. मान्सूनपूर्व पावसा आभावी शेतजमीन घट्ट होत चालली असून, त्यामध्ये नांगरणी करणे कठीण होणार आहे. शेतीचे क्षेत्र मोठे असल्याने पेरणीपूर्व तयारीसाठी शेतात कृत्रिमरीत्या पाणी देणे शक्य नाही. मान्सूनपूर्व पाऊस वेळेत न झाल्यास खरीप हंगाम लांबण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून बोलली जात आहे.
हे नक्की वाचा : या योजनेत सहभागी व्हा ; मिळतील एकरी 50 हजार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1