राज्यात जनावरांमधील लम्पी स्कीन आजाराचा फैलाव वरचेवर वाढत असल्याने पशुपालक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्यातील 12 जिल्ह्यातील 102 गावांमध्ये याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले असून, या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झाले आहे.
ब्रेकिंग : यंदा ऊस गाळप 15 दिवस आधी सुरु होण्याची शक्यता ?
या आजारामुळे राज्यातील पहिला मृत्यू पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झाला आहे. उत्तर भारतात जनावरांमध्ये ही साथ आली असून, ती वेगाने आपल्याकडे फैलावत आहे. राज्यात प्रथम जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावात 4 ऑगस्टला लम्पी स्कीन रोगाची लागण झालेली जनावरे आढळून आली होती. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला.

सध्या राज्यातील अहमदनगर, अकोला, सातारा, बुलडाणा, उस्मानाबाद, अमरावती, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या 12 जिल्ह्यात लम्मी स्कीन आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला आहे. 102 गावातील जनावरांवर याचा प्रादुर्भाव झाला आहे.
मोठी बातमी : शेतकऱ्यांसमोर विषारी घोणस अळीचे खतरनाक संकट
दरम्यान, बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिघातील 492 गावातील एकूण 1 लाख 57 हजार 696 पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावातील एकूण 997 बाधित पशुधनापैकी 628 पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यात 10, अहमदनगर जिल्ह्यात एक तर पुणे जिल्ह्यात दोन अशा एकूण बाधित 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
यामुळे राज्यातील पशुपालकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. बीड जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासने सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरुर कासार आणि पाटोदा या तालुक्यातील जनावरांचे बाजार पुढचे काही काळ बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
ब्रेकिंग न्यूज : ई-केवयसीसाठी पुन्हा मुदतवाढ !
महाराष्ट्रात 2020 मध्येही या रोगाची पशुधनास लागण झाली होती. मात्र, वेळीच पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना केल्याने त्या वेळी या रोगाची साथ आटोक्यात आणण्यात यश आले होते. त्यामुळे शेतकर्यांनी घाबरून न जाता आपापल्या जनावरांच्या लसीकरणास प्राधान्य द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाने केले आहे.
मोठी बातमी : नवीन कापसाला मिळाला चक्क एवढा भाव ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1