लम्पी स्कीन रोग हा त्वचा रोग असून, विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. याचा प्रादुर्भाव झाल्यास तो मोठया प्रमाणात पसरतो. याचा प्रसार किटकांमार्फत होतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही.
ब्रेकिंग : जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा 12 जिल्ह्यात फैलाव
लम्पी स्कीन प्रथम दक्षिण व पूर्व आफ्रिकामध्ये आढळला होता. सन 2000 मध्ये तो मध्य-पूर्वेतील देश, त्या नंतर सन 2013 मध्ये तुर्की येथे आढळला. अलिकडेच तो राशीया, चायना, बांग्लादेश व आत्ता भारतात पसरताना दिसत आहे. भारतामध्ये गोवा, गुजरात, हरीयाणा, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब व अंदमान-निकोबार या राज्यात दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यात अहमदनगर, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातुर, बीड या जिल्हयामध्ये या आजाराचे प्रमाण दिसून आले आहे.
लम्पी स्कीन आजाराची लक्षणे
जनावरांना रोगाची लागण झाल्यास, जनावरांचे खाणे-पिणे कमी होते. दुध उत्पादन घटते. शरीर तापमान 104 ते 150 फॅ. इतके वाढते. नाकातून, डोळ्यातून स्त्राव वाहतो, तोडांतून लाल गळते. लसिका ग्रंथीना सुज येते. हळु-हळु डोके, मान, पोटाचा भाग, मायांग, कास या भागावर 10 ते 15 मिली मिटर व्यासाच्या गाठी येतात. तोंडात व्रण-जखमा होतात. तोंडातील जखमांमुळे जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. काही जनावरांना पायावर सुज येऊन लंगडतात. अंगावर आलेल्या गाठी फुटतात व तिथे जखमा होतात.
महत्त्वाची गोष्ट : पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी
प्रतिबंधात्मक उपाययोजना
हा आजार संसर्गजन्य असल्याने येऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना व आजार आल्यास त्याचा प्रसार होऊ नये या करिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाधीत क्षेत्रातील बाजारातील जनावरे आपल्या गोठयात किव्हा गावात आणू नयेत. या रोगाचा प्रसार डास, गोचिड व कीटकामुळे होत असलेने कीटकनाशक स्प्रे गोठयात धुर करून कीटक किव्हा मच्छर नियंत्रण करणे आवश्यक आहे. गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. रोगग्रस्त जनावरांना इतर जनावरापासून किमान एक महिना वेगळे ठेवावे. जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळील पशुवैद्यक दवाखान्यामध्ये संपर्क करावा. बाधित गावामध्ये बाधित जनावरांच्या व निरोगी जनावरांच्या पाण्याची चाऱ्याची स्वतंत्र व्यवस्था करावी.
बाधित क्षेत्रातील जनावरांच्या गोठयाला भेटी टळाव्यात. बाधित गोठा व परीसरात निर्जतुक द्रावणाची फवारणी करावी. त्या करिता 1 % फॉर्मलिन किंवा 2 ते 3 % सोडियम हायपोक्लोराईड किंवा 2% फिनॉलची फवारणी करावी. मृत जनावरांची शास्त्रीय पध्दतीने खोल खड्यात पुरून विल्हेवाट लावावी. त्यावर व खाली चुन्याची भुकटी पसरावी.
महत्त्वाच्या टिप्स : उन्हाळ्यात कोंबड्यांची अशी घ्या काळजी
लम्पी रोग नियंत्रणासाठी लसिकरण गरजेचे आहे. यासाठी बाधित गावामध्ये व त्याच्या 5 किलो मिटर परिघातील गाय-म्हैस वर्गातील चार महिने वयाच्या पुढील सर्व जनावरांचे जवळील पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसिकरण करावे. लम्पी स्कीन रोग औषधोपचाराने निश्चित बरा होत असल्याने बाधित जनावरांना पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.
रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 मधील कलम 4(1) नुसार जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी या रोगाबाबतची माहिती जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.
डॉ. प्रकाश कदम विशेषज्ञ (पशुवैद्यक शास्त्र), डॉ. लालासाहेब तांबडे विषय वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर
फायद्याच्या टिप्स : पावसाळ्यात घ्या कोंबड्यांची निगा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1