Farmer felicitated in Delhi : राष्ट्रीय दिनाचे (National Day) औचित्य साधून आज ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या (76th Independence Day) निमित्त बारामती तालुक्यातील ढेकळवाडी गावचे अल्पभूधारक शेतकरी (Farmer) अशोक सुदाम घुले यांचा सपत्नीक सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे होणार आहे.
मोठी बातमी : थकित एफआरपी ठेवणाऱ्या 4 साखर कारखान्यांविरुघ्द जप्तीचे आदेश
केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (Pradhan Mantri Shektar Samman Yojana) सुरू केली. त्याच अनुषंगाने त्यांनी शेतकऱ्यांचा सन्मान करण्याकरता दिल्लीमध्ये विविध क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचे नियोजित केले. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ढेकळवाडी गावचे शेतकरी अशोक सुदाम घुले (Sudam Ghule) यांना आणि त्यांच्या पत्नीला निमंत्रित केले आहे. विशेष बाब म्हणजे पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान होणारे अल्पभूधारक घुले दाम्पत्य हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावालगतचे शेतकरी आहेत.
महत्त्वाचे : कांद्याबाबत केंद्राने घेतला मोठा निर्णय : कांदा उत्पादकांना बसणार फटका
बारामती तालुक्यातील ढेकळवाडी गावातील अत्यल्प भूधारक शेतकरी अशोक सुदाम घुले यांची गावात साठ गुंठे शेती आहे. बारामती (Baramati) परिसर हा पुणे जिल्ह्यातील कमी पावसाचा प्रदेश म्हणून गणला जातो. या परिसरात पावसाची कमतरता असल्याने इथे बाजरी, मका, सोयाबीन इत्यादी पिके घेतली जातात. घुले यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन (goat farming), पशुपालन सुरु केले. याकरिता त्यांनी स्वताच्या शेतात बाजरी, सोयाबीन, मका, ऊस, इत्यादी पिके घेतली. घुले यांचे संपुर्ण कुटुंब शेतीच्या व्यवसायात करतात. यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे.
अशोक घुले (Ashok Ghule) यांना पंतप्रधान कृषी सन्मान निधीतून प्रत्येकी दोन हजार रुपयांचे चौदा हफ्ते त्याच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. रक्कम जरी छोटी असली तरी या रकमेचा फायदा त्यांना खते आणि शेतीला लागणाऱ्या इतर गोष्टीसाठी झाला असून, त्यांना या योजनबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. आज १५ ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ला येथील कार्यक्रमात अशोक घुले आणि त्यांच्या पत्नी यांना पंतप्रधान (Pradhan Mantri) कार्यालयाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी त्यांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.
मोठी बातमी : टोमॅटो पाठोपाठ आता कांदाही महागणार ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03