आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी 25 वर्षांसाठी ‘पंचप्राण’ कार्यक्रम देशासमोर ठेवला आहे.
हे वाचा : कृषी हा माझा आवडता विषय : कृषीमंत्री अब्दुल सत्तार
येत्या काळात देशवासियांनी या ‘पंचप्राण’वर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. पहिला संकल्प सांगताना ते म्हणाले, मोठ्या संकल्पाने देश आता पुढे जायला हवा व जात असताना खूप मोठी जिद्द घेवून चालायचे आहे. दुसरा संकल्प सांगताना ते म्हणाले, की जर आपल्या मनामध्ये अजून देखील गुलामगिरीचा छोटासा जरी भाग मनाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत पळवावे लागेल. शेकडो वर्षे गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या अवस्थेतून आता शंभर टक्के सुटका करावी लागेल.

तिसरा संकल्प सांगताना ते म्हणाले, प्रत्येक भारतीयाला आपल्या वारशाचा अभिमान असायलाच हवा. कारण हा तो वारसा आहे ज्याने कधीकाळी भारताला सुवर्ण काळ दिला. त्यामुळे या वारशाचा आपल्याला अभिमान असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे महत्त्वाच्या भारतीय वारशाचा अभिमान ठेवणे गरजेचे आहे.
लक्षवेधी बातमी : नांदेड येथे शेतकरी आक्रमक : लक्षवेधी मोर्चे
तिसरा संकल्प सांगताना ते म्हणाले, की 135 कोटी देशामध्ये एकता असणे खूप गरजेचे असून, ना स्वतःचा ना कोणी परका ही भावना ठेवून एकतेची शक्ती ही एक श्रेष्ठ भारताच्या स्वप्नांसाठी आपली चौथी महत्त्वाची प्रतिज्ञा आहे. तर पाचवा संकल्प सांगताना त्यांनी यामध्ये त्यांनी नागरिकाचे कर्तव्याविषयी संबोधन केले. ते म्हणाले की, नागरिकाचे कर्तव्यामध्ये, नागरिकमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचा देखील समावेश होतो कारण ते देखील नागरिक आहेत.
येणाऱ्या पंचवीस वर्षांमध्ये स्वप्न पूर्ण करणे ही एक मोठी प्राणशक्ती असून, जेव्हा आपली स्वप्ने मोठी होतात, जेव्हा विचार मोठी असतात तेव्हा प्रयत्नदेखील खूप मोठे असतात. त्यामुळे देशाच्या बाबतीत असलेली नागरिकांची कर्तव्य म्हणजे आपली कर्तव्य जपणे हे देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आनंदाची बातमी : वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार जाहीर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇