चौथ्या अग्रीम अंदाजानुसार 2021-22 मध्ये देशात 3 हजार 157 लाख टन अन्नधान्याचे उत्पादन अपेक्षित आहे. हे उत्पादन 2020-21 मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा 50 लाख टन अधिक असणार आहे. 2021-22 मध्ये एकूण डाळी आणि तेलबियांचे विक्रमी उत्पादन अनुक्रमे 277 आणि 377 लाख टन इतके असल्याचा अंदाज असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. रब्बी हंगाम 2022-23 च्या राष्ट्रीय कृषी परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हास्ते करण्यात आले. त्यावेळी तोमर बोलत होते.
मोठी घोषणा : सहकारी सोसायट्या मार्फत मध्यम व दीर्घ पतपुरवठ्याचा धोरणात्मक विचार : अमित शहा
केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे कृषी क्षेत्रात आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे सांगून तोमर म्हणाले, उत्पादनाच्या बाबतीत देशात बरेच काम झाले आहे. त्यामुळे अन्नधान्य, डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. आज कृषी क्षेत्रापुढील आव्हाने हाताळणे आणि त्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
2022-23 या वर्षासाठी एकूण अन्नधान्य उत्पादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट 3280 लाख टन ठेवण्यात आले असल्याचे सांगून ते म्हणाले, यामध्ये रब्बी हंगामाचा वाटा 1648 लाख टन असेल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून 1.22 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणले पाहिजे. यामुळे विशेषतः लहान शेतकऱ्यांना सुरक्षित वाटेल, असे तोमर म्हणाले.
ब्रेकिंग न्यूज : आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना !
रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत असल्याचे सांगून तोमर म्हणाले, आहे. त्यामुळे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर नैसर्गिक शेतीवरही आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कृषी क्षेत्राला पुढे नेत आहे. कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातूनही त्याचा विस्तार करण्यात येत आहे. राज्य सरकारांनीही या दिशेने अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे तोमर यावेळी म्हणाले.
मोहरीचे उत्पादनात वाढीबाबत शेतकरी आणि राज्य सरकारांचे कौतुक करून तोंर म्हणाले, मोहरीचे उत्पादन गेल्या दोन वर्षात 91.24 वरून 29 टक्क्यांनी वाढून 117.46 लाख टन झाले आहे. उत्पादकता 1 हजार 331 वरुन 1 हजार 458 किलो हेक्टरवर 10 टक्क्यांनी वाढली आहे. रेपसीड आणि मोहरीचे क्षेत्र 2019-20 मध्ये 68.56 वरून 17 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 80.58 लाख हेक्टर झाले आहे.
ब्रेकिंग : सोमवारीपासून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत : कृषीमंत्री सत्तार
वाढलेल्या मोहरी उत्पादनामुळे पाम आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीची तफावत भरून निघण्यास मदत होईल. सरकार आता मोहरी मिशनच्या धर्तीवर विशेष सोयाबीन आणि सूर्यफूल मिशन राबवत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळावा यासाठी केंद्र सरकारने शेतकरी आणि सरकारमधील दरी कमी करण्यासाठी डिजिटल शेतीचे काम सुरू केले आहे. डिजिटल कृषी मिशनवरही एकत्र काम करण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. संपूर्ण जगात भारत या कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहे. भरड धान्याचे उत्पादन आणि निर्यात वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महा ब्रेकिंग न्यूज : अखेर ठरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1