जागतीक नारळ दिनाचे औचित्य साधून 2 सप्टेंबर रोजी नारळ विकास मंडळाच्या वतीने विविध कार्याक्राचे आयोजन करण्यात आले असून, यंदा उज्वल आयुष्य आणि भविष्यासाठी नारळ शेती ही थीम घेवून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत जागतीक नारळ दिन साजरा करण्यात येणार आहे.
ब्रेकिंग : ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा उद्या मेळघाटात शुभारंभ
यानिमित्ताने नारळ विकास मंडळाच्या वतीने गुजराथ येथील जुनागड येथे मंडळाचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन 2 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रीय व निर्यात उत्कृष्टता पुरस्कार विजेत्यांची घोषणा करणार आहेत.

मोठी बातमी : महा-ऊस नोंदणी ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध
दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या उपस्थितीत कोची येथे जागतीक नारळ दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. नारळ विकास मंडळ आणि इंटरनॅशनल कोकोनट कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कोची येथील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या कार्यक्रमाचा भाग म्हणून कोची येथे 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान गुड अॅग्रिकल्चर प्रॅक्टिसेस या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे.
मोठी बातमी : परतीचा पाऊस आठवड्यात दाखल होणार !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1