आपल्या अचूक हवामान अंदाजामुळे पंजाबराव डख हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. शेतकऱ्यांच्या मते त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याने त्यांना याचा मोठा फायदा होत आहे. पंजाबराव डख यांनी 28 फेब्रुवारी रोजी एक हवामान अंदाज सार्वजनिक केला होता. त्यानुसार पावसावे हजेरी लावली आहे.
ब्रेकिंग : मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
पंजाबराव डख यांनी 28 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक केलेल्या आपल्या हवामान अंदाजात चार मार्चपासून राज्यात हवामान बदलणार असल्याच सांगितले होते. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात चार मार्चपासून हवामानात बदल झाला आणि सहा मार्चला पावसाने हजेरीही लावली. यापुढे 10 मार्चपर्यंत हवामान हे खराब राहणार असल्याचे त्यांनी सांगितले असून, 4 मार्च ते 10 मार्च दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता त्यांनी वतर्वली आहे.
त्यांच्या मते 4 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, नासिक पट्ट्यात मोठा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यांनी हा वर्तवलेला अंदाज सत्यात उतरला आहे. 04 मार्च रोजी रात्री नासिक जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा या भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस पडला आहे. अहमदनगर मध्ये देखील पावसाची हजेरी राहिली आहे. खानदेशात देखील काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले आहे.
ब्रेकिंग : कांदा उत्पादकांना मिळणार अनुदान !
पंजाबराव डख यांच्या मते 10 मार्चपर्यंत राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नासिक, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, शिर्डी, माजलगाव, शिरूर या भागात पाऊस पडणार आहे. तसेच यावेळी शेतकऱ्यांना होळीच्या सणाला पाऊस हमखास पडतो असे देखील सांगितले असून, होळी सण होऊन दोन दिवसांनी कायमच पाऊस पाहायला मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आनंदाची बातमी : आता ‘डीएपी’ मिळणार निम्म्याहून कमी किमतीत
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1