पंजाबराव डख यांचा जून महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर

0
951

राज्यात मान्सून पावसाचे आगमन झाले असून, त्यामुळे लवकरच शेती कामाला वेग येणार आहे. शेतकरी आता खते आही बियाणे खरेदीच्या तयारीत आहेत. आज हवामान विभागाने मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे जाहीरही केले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे लक्ष लागूण राहिलेला हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील जून महिन्यातील मान्सून पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.

आनंदाची बातमी : अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल

पंजाबराव डख यांनी 25 जून पर्यंतचा आपला मान्सून अंदाज सार्वजनिक केला आहे. डख यांच्या मते 11 जून म्हणजेच कालपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. या पावसाचा नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 11 जून पासून ते 15 जून पर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता त्यांनी यांनी वर्तवली आहे. 16 आणि 17 या दोन दिवशी मराठवाड्यात अति मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली असून 22 तारखेपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडणार असल्याचे भाकितही  पंजाबराव डख यांनी वर्तवले आहे.

लक्षवेधी बातमी : पीकविम्याबाबतची कॉर्पोरेटधार्जिनी नीती सरकारने बदलावी : पी. साईनाथ

शेतकऱ्यांना सल्ला देताना ते सांगतात की, राज्यातील शेतकरी बांधवांनी 18 ते 22 तारखेपर्यंत आपली पेरणीची कामे उरकून घ्यावीत. शेतकरी बांधवांनी जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी. पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी केल्यास शेतकरी बांधवांच्या अंगलट येऊ शकते आणि हजारो रुपयांचा खर्च होऊ शकतो. त्यांनी शेतकरी बांधवांना चांगले दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरण्याचा सल्लाही दिला आहे. विद्यापीठाचे बियाणे वापरल्यास शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आनंदाची बातमी : केंद्राकडून 17 पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4.5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here