महाबळेश्वरच्या प्रसिद्ध स्ट्रॉबेरीच्या (Strawberries of Mahabaleshwar) नावावर इतर ठिकाणी उत्पादीत होणार्या स्ट्रॉबेरीची विक्रीही महाबळेश्वरचीच स्ट्रॉबेरी म्हणून केली जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. ही फसवणूक टाळण्यासाठी आता महाबळेश्वरहून येणार्या स्ट्रॉबेरीच्या बॉक्सवर क्यूआर कोड टाकला जात आहे. यामुळे स्ट्रॉबेरी ग्राहकांना महाबळेश्वच्या स्ट्रॉबेरीची अस्सल चव चाखता येणार आहे.
महाबळेश्वरच नाही तर अगदी मराठवाड्यातील (Marathwada) डोंगराळ भागातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र, आजही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चवच न्यारी असल्याने ग्राहकांकडून त्याचीच मागणी अधिक होत आहे. पण बाजारात वेगवेगळ्या भागातील स्ट्रॉबेरी दाखल होत असल्याने ग्राहकांची पंचाईत होत आहे. त्यावर पर्याय म्हणून आता कृषी पणन मंडळ कोल्हापूर व प्रक्रिया सहाकरी संस्थांकडून यावर रामबाण उपाय काढला आहे. आता महाबळेश्वर येथे उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या बॉक्सवर क्यूआर कोड प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. सध्या या उपक्रमात केवळ 10 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असला तरी भविष्यात यामध्ये शेतकरी संख्या वाढणार असल्याचा विश्वास पणन मंडळाला आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
लाल मिरचीचा ठसका दर 25 हजारावर
ई-पीक पहाणीसाठी शेवटचे दोन दिवस बाकी
नॅनो टेक्नॉलॉजीची कमाल सहा महिन्याचा ऊस 12 कांड्यावर
अकोला कृषी विद्यापीठाच्या चवळीच्या या वाणाला मिळाली मान्यता
एफआरपी न देणारे 28 कारखाने लाल यादीत
स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरचीच आहे, हे ओळखण्यासाठी या अत्याधुनिक प्रणालीचा उपयोग होणार आहे. या क्यूआर कोडमुळे स्ट्रॉबेरी कोणत्या शेतकऱ्याची आहे ? स्ट्रॉबेरी (strawberry) लागवडीचे ठिकाण कोणते ? या मधील न्यूट्रीशन व्हॅल्यू, स्ट्रॉबेरीची तोडणी आणि बॉक्स पॅकिंगची पध्दत एवढेच नाही तर या कोडमुळे जर सेंद्रीय पध्दतीची स्ट्रॉबेरी असेल तर त्यासोबत त्याचे प्रमाणपत्रही या कोडच्या माध्यमातून पाहवयास मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पाहिजे तीच स्ट्रॉबेरी मिळणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 आमचे इंस्टाग्राम पेजला फॉलोव्ह करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇