राज्यातील सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात काही जिल्ह्यात मुसळधार काही जिल्ह्यात अति मुसळधार तर काही जिल्ह्यात रिपरिप पाऊस सुरु आहे. अजून पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मोठी घोषणा : दोन महिन्यात केळी विकास महामंडळ स्थापन करणार : भुमरे
राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या दृष्टीने चिंतेचे असणार आहेत. कारण संपूर्ण राज्यभरात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या पाऊस सुरु असल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे. राज्यातील काही ठिकाणी 24 तासात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या 25 तासांत अनेक ठिकाणी पावसाने 100 मिमी जास्त बरसला आहे. लोणावळ्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात अजून म्हणावा असा पाऊस झालेला नाही.
राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस असणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवला आहे.
लम्पी आजार : पशुपालकांना अशी मदत मिळणार : राधाकृष्ण विखे -पाटील
घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी आणि शुक्रवारी दुर्गम भागात असलेल्या शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवल्या जाणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना नगर 253 मिमी, नवजा 272 मिमी तर महाबळेश्वर 331 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. लोणावळ्यात गेल्या तीन दिवसांत 700 पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस लोणावळ्यात झाला आहे.
उद्या रविवारी (दि. 23) ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, नगर, जालना, नगर, संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर बुलडाणा, परभणी, नांदेड हे जिल्हे वगळता संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांनी वाचला हा पाढा
सोमवारी (दि. 24) रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. तर उर्वरीत मुंबई, नाशिक, पुणे, बुलडाणा, परभणी, नांदेडसह उर्वरित संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. 25) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, सोलापूर आणि धाराशीव या जिल्ह्यांना कुठलाही इशारा नाही पण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसे उर्वित विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बुधवारी (दि. 26) कोकण किनारपट्टीवरील तीन जिल्हे तसेच सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मिळून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, पुण्यासह संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात सामान्य पाऊस राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ब्रेकिंग : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांचा सभात्याग !
https://www.facebook.com/shetimitramagazine03