राज्यात गेल्या दोन दिवसात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून, आज (सोमवार) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. तर इतर ठिकाणी मात्र पावसाची रिपरिप सुरुच आहे. दोन दिवसातील या पावसामुळे काही ठिकाणी जनजिवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी नद्या-नाले खळाळून वाहत आहेत. हवामान विभागाने आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला.
राज्याच्या अनेक भागांत सोमवारीही पावसाची रिपरिप सुरु होती. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावासाचा जोर अधिक आहे. तर खानदेश आणि मराठवड्यातही काही भागांत जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिह्यांत पाऊस सुरुच आहेत. या पावसामुळे कोकणात भातरोप लागवडीला वेग आला आहे.
महत्त्वाची बातमी : राज्यात सर्वदूर पाऊस : मराठवाड्यात पिकांचे नुकसान
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतेय. राधानगरी धरणातून 1350 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीवरील 39 बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात सोमवारीपावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे जिल्ह्यातही सर्वदूर पावसाची रिपरिप सुरु आहे.
नगर जिल्ह्यातील तालुक्यातील प्रवरा, मुळा, आढळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुळा धरणात सोमवारी (ता.11) सकाळी कोतुळ जवळ 7 हजार 667 क्यूसेस पाण्याची आवक सुरू होती. मुळा पाणलोट क्षेत्रातील कोथळे व आढळा पाणलोट क्षेत्रात पाडोशी ही जलाशये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. निळवंडे धरणातील पाणीसाठा 50 टक्क्याच्या पुढे गेला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम होता. रविवारी रात्रीपासून महाबळेश्वर, पाटण, जावळी, सातारा, खंडाळा, वाई तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाच्या दमदार सरी सुरू आहेत.
आनंदाची बातमी : वायगाव हळदीचे टपाल विभाग करणार ब्रँडिंग
विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर इतर ठिकाणी हलक्या सरी पडल्या. वऱ्हाडात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊसही पडला. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना ,बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी राहीला. तर नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील 52 तर हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांमध्ये हलका पाऊस झाला.
खानदेशात मागील तीन दिवसांपासून सर्वत्र पाऊस बरसत आहे. धुळे, जळगाव जिल्ह्यातील काही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. जळगाव जिल्ह्यात जुलैमधील सरासरीच्या 37 टक्के पाऊस गेल्या काही दिवसांत झाला आहे. सोमवारीही सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु होती.
ब्रेकिंग न्यूज : महावितरणने वीज दरात केली मोठी वाढ
मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी नद्यांना पूर आला. काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले, रस्ते खरडून निघाले. नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांत काही गावांचा संपर्क तुटला. तर पूर्व विदर्भातही पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले.
दरम्यान, हवामान विभागाने आज विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला. तर कोकणातील सर्व जिल्ह्यांसह कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदीया जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मोठी बातमी : स्मार्ट मधील २३१ प्रकल्पांना मान्यता
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1