राज्यात पावसाला पोषक हवामान असले तरी अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अशात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मोठा निर्णय : लॉटरी पद्धत बंद ; मागेल त्याला ड्रीप आणि शेततळे : कृषीमंत्री धनंजय मुंडे
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने आज (दि. 17) कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, देशातील अनेक भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 18 जुलैच्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याचा परिणाम हा राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील होणार आहे.
मोठी बातमी : राज्यातील 100 रोपवाटिकांची मान्यता रद्द
मान्सून हंगाम सुरू झाल्यापासून राज्यात पहिल्यांदाच 16 जुलै रोजी सामन्य पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भ प्रथमच सामान्य श्रेणीत आले आहेत. तर मराठवाड्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद आहे. मात्र पुढील काही दिवसांत ही त्रुटी भरून निघेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सध्या कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत. संपूर्ण विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी मध्य भारत, झारखंड, ओडिशाच्या आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
जुलै अर्धा संपला असला तरी राज्याच्या विविध भागात पावसाने ओढ दिली आहे. यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सोलापूर सारख्या काही जिह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यात 1 जूनपासून 15 जुलैपर्यंत एकूण 350 मिमी पैकी 276 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास सरासरीमधील 21 टक्के तूट भरून येण्यास मदत होणार आहे.
ब्रेकिंग : चिंदर येथे 41 जनावरांचा विषबाधेने मृत्यू
पुढील पाच दिवसात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज पावसाची शक्यता आहे. मुंबईत गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली असून मुंबईत 17 जुलैपासून तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 17, 18 आणि 19 जुलै रोजी मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
महत्त्वाच्या टिप्स : डाळींबाच्या मृग बहाराचे परफेक्ट व्यवस्थापन
https://www.facebook.com/shetimitramagazine03