यंदा अवकाळी आणि लांबलेला परतीचा पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असताना आणि आत्ता कुठे सर्वकाही मार्गी लागले असताना चिंताजनक बातमी समोर आली आहे. चालू फेब्रुवारी महिन्यात देशात 89 ते 122 टक्के म्हणजेच सरासरी इतक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे पुन्हा फळबागा आणि भाजीपला पिके धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
मोठी बातमी : केळी तेजीत : भाव 4 हजारावर जाण्याची शक्यता !
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सर्वसाधारण 1971 ते 2020 या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी 27.2 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत ला-निना निवळून सर्वसामान्य स्थिती येण्याची शक्यता आहे. तर इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सामान्य स्थितीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक ते सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

पश्चिम मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक, तर गुजरातसह दक्षिण भारतातील राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती निवळण्यास सुरुवात झाली असून, त्याचा मोठा परिणाम हवामान बदलावर होणार आहे.
अर्थसंकल्प 2023-24 : नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत !
दरम्यान, अशा पावसाळी व ढगाळ वातावरणाने पिके संकटात येण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होणार असून, फळबागा आणि भाजीपला पिके धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. आर्द्रता जास्तकाळ राहिल्यास शेतकऱ्यांना बुरशीनाशके, किडनाशके व संप्रेरकांची फवारणी करावी लागणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे.
अर्थसंकल्प 2023-24 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना प्रत्येक्षात काय मिळाले ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1