Rain in the state : राज्यातील तापमानात चढ-उतार सुरू असून, सध्या पहाटे थंडी तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. हवामानशास्त्र विभागाने (Department of Meteorology) गुरुवारपासून राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
संपूर्ण राज्यात बुधपारपर्यंत कोरडे हवामन रहणार असल्याचा अंदाज असून 14 नोव्हेंबरपासून मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर शुक्रवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरीत महाराष्ट्रातमात्र कोरडे हवामान राहील असेही हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
कोकणात (Kokan) उन्हाचा पारा चठला असून, त्यासोबत गारठाही वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. उर्वरीत राज्यात कडाक्याच्या थंडीचा प्रतिक्षा आहे.
पुढील 24 तासाता नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून, पुढील दोन दिवसात कमी दाब क्षेत्र तामिळनाडूकडून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडू आणि आंधप्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता हवामन विभागाने वर्तवली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇