राज्यात काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात पावसाचा पत्ता नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. असे असताना येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात संमिश्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 13 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या टिप्स : डाळींबाच्या मृग बहाराचे परफेक्ट व्यवस्थापन
सध्या राज्यात कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस नसल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधील चिंता वरचेवर वाढत आहे. अशात हा नवा अंदाज आल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

राज्यातील काही भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, राज्यातील अनेक भागामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात पेरण्या आणि शेतीची कामे खोळंबली आहेत.
लक्षवेधी पीक : 35 दिवसात कोथिंबीरीचे 6 टन उत्पादन तंत्र
सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर, ठाणे,पुणे, नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर आहे. विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येत्या 4 – 5 दिवसांमध्ये संमिश्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मोठी बातमी : कृषी उत्पादकता वाढवण्याची जबाबदारी कृषी वैज्ञानिकांची : डॉ. मांडवीय
आज 12 जुलै रोजी घाट असणाऱ्या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज असून, उद्या 13 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर भारतातील पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणात या चार राज्यात मध्ये मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने हाहाकार उडाला आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफची 39 पथके तैनात करण्यात आली आहेत.
नक्की वाचा : ई-केवायसी अभावी शेतकरी अवकाळीच्या नुकसान भरपाईपासून वंचित

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇