सध्या राज्यात होळीची धामधूम सुरू असताना आवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
ब्रेकिंग : कांदा उत्पादकांना मिळणार अनुदान !
हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसळीकर यांच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात 6 व 7 मार्च रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तर मुंबईसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाने तुरळक हजेरी लावली आहे.
पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, बीड आणि उत्तर मध्ये महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता आहे. तर बदलापूरलाही हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
आनंदाची बातमी : आता ‘डीएपी’ मिळणार निम्म्याहून कमी किमतीत
बऱ्याच ठिकाणी तुरळक हलक्या स्वरुपातील सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत असून, सध्या पुण्यात सकाळी व सायंकाळनंतर किमान तापमान कमी असल्याने गारवा जाणवत आहे.
कोकण, गोवा व विदर्भातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात किमान तापमान साधारण 16 अंश सेल्सिअस असल्याने सकाळी व रात्री गारवा जाणवत आहे. तसेच दिवसभरही ढगाळ वातावरण असल्याने दुपारी खूप कडक उन्हाचा त्रास होत नसल्याचे दिसून येत आहे. येत्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
खूशखबर : उन्हाळी हंगामातही आता गव्हाची शेती शक्य : गव्हाचा नवा वाण विकसित
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1