राज्यात बहुतांश सर्वच भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर दुसरीकडे उन्हाची तिव्रता वाढली आहे. यामुळे खरीपाची पीक सुकू लागली आहेत. या पिकांना सध्या पावसाची गरज असल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाढ पहात आहेत. अशाच हवमानाचे अभ्यासक असलेले पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आजपासून राज्यातील काही जिल्ह्यात पावसला सुरूवात होणार आहे.
हे नक्की वाचा : कृषी संशोधन शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावे : गडकरी
यंदा पावसाने जूनच्या सुरुवातीला हुलकावणी दिली. मात्र जुलै महिन्यात बेभान पाऊस झाला मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले. राज्यातील बहुतांश 26 जिल्ह्यात या अतिवृष्टीचा फटका बसला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाही पावसाच रोज वाढत गेला त्यामुळे राज्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला.
धक्कादायक : आत्महत्येचे सत्र सुरुच : जालन्यात शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
यापावसामुळे खरीपाची पिके हातातून गेली. जी काही पिके यातून वाचली ती मात्र पावसाच्या खंडानंतर पडलेल्या तिव्र उन्हामुळे सध्या सुकून चालली असल्याने सध्या शेतकऱ्यांना पावसाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे परतीचा पाऊस कधी येणार याची वाट शेतकरी पहात असतानाच हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवा अंदाज जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

डख यांच्या अंदाजानुसार राज्यात 29 ऑगस्टपासून पावसाला सुरूवात होणार आहे. तो पाऊस सलग 6 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. यंदा राज्यात 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत आहे. त्या दिवशीपासून पावसाचा जोर वाढणार असून, तो सलगत 6 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. डख यांच्या मतानुसार हा पाऊस राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र हजेरी लावणार आहे.
मोठी घोषणा : कोकणातील आंबा बागायतदारांना उद्योगमंत्र्यांचा दिलासा
हा पाऊस उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्हायात हाजेरी लावणार आहे. तसेच बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावणार असून, या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नक्कीच तूर्तास दिलासा मिळणार असल्याचेही पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
हे वाचा : संघटित लढ्याशिवाय ऊसतोड मजुरांना पर्याय नाही : डॉ. डी. एल. कराड
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1