शेतीला दिवसा दहा तास वीज पुरवठा मिळावा यासाठी 15 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच असून त्याचाच भाग म्हणून शुक्रवार, दि. 4 मार्च रोजी राज्यभर ग्रामीण भागात रस्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, उर्जामंत्र्यांच्या फोन आला आहे. त्यांनी चर्चेला बोलवले आहे. आम्हीही चर्चेसाठी सकारात्मक आहोत. जोपर्यंत यातून मार्ग निघत नाही, तोपर्यंत आम्ही धरणे आंदोन सुरूच ठेवणार आहोत. धरणे आंदोलन सुरू ठेवूनच मी चर्चेत सहभागी होणार आहे. दरम्यान, राज़्यातील कोत्या नेत्यांनी कोत्या प्रकल्पात किती पैसे गुंतले तयाचे बिंग आठवडाभरात फोडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.

4 मार्चपर्यंत सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास जिल्ह्यातील लोकप्रितिनिधींना विकासकामांचे उद्घाटन करण्यापासून रोखण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांना लुटून झाल्यानंतर आता या पांढर्या कापड्यातील दरोडेखोरांनी वीज प्रकल्पाच्या माध्यमातूनही पैसे लुटायला सुरूवात केली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केले. वीज प्रकल्पात नेत्यांनी केलेले घोटाळे पुराव्यासह बाहेर काढण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
यंदा कसा असेल उन्हाचा चटका… काय आहे तापमानाचा अंदाज ?
हमीभावाने 6.89 लाख टन हरभरा खरेदीचे उद्दीष्ट
एकच चर्चा : गायीच्या डोहाळे जेवणाची
या आंदोलनास जिल्ह्यातील विविध नेत्यांबरोबर जिल्ह्यातील जवळपास दीडशेहून अधिक ग्रामपंचायती, विविध संस्था, सेवा सोसायटी यांच्यासह सामाजिक संस्थांकडून पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇