RBI Pilot Project : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म अर्थात पब्लिक टेक प्लॅटफॉर्मचा (Public Tech Platform) पायलट प्रोजेक्ट सुरू केला असून, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या (RBIH) माध्यमातून आता शेतीसाठी सहज कर्ज (Easy Loans for Agriculture) उपलब्ध करता येणार आहे.
मोठी बातमी : कृषिमंत्र्यांनी दिल्या कृषी विद्यापीठांना या सक्त सूचना
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी नुकतीच याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे यामध्ये पहिल्या टप्प्यात कृषी पतपुरवठ्यावर भर दिला जाणार आहे. तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर (Tech Platform) पायलट प्रकल्पादरम्यान 1.6 लाख रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड, दूध उत्पादकांना कर्ज, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (Small and Medium Enterprises) कोणत्याही प्रकारचे तारण न देता कर्ज देता येणार आहे. वैयक्तिक कर्ज (Prsanal Loan) आणि गृह कर्ज (Home Loan) देखील या माध्यमातून देता येणार आहे.

या प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज वितरण, इलेक्ट्रॉनिक केवायसी, राज्य सरकारांच्या जमिनीच्या नोंदी, पॅनची वैधता, आधार ई-स्वाक्षरी आणि घर आणि मालमत्ता शोधण्याचे काम करता येणार आहे. पब्लिक टेक प्लेटफॉर्ममुळे आरबीआयची (RBI) बॅंका उपलब्ध नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांनाही या पायलट प्रोजेक्टमुळे (Pilot Project) कर्ज देता येणे सहज शक्य होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास यांनी सांगितले.
ब्रेकिंग : केंद्राच्या धोरणावर कांदा उत्पादक संतापले

https://www.facebook.com/shetimitramagazine03