कोरोना, ओमिक्रॉचे वातारण निवळत असून, बाजारपेठेवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. ग्राहकांनी बाजारपेठा भरू लागल्या आहेत. त्यामुळे शेतीमालालाही चांगला उठाव मिळत आहे. विशेषत: फळांच्या मार्केटमध्येही तेजी दिसून येत आहे. हापसू आंबा बाजार आल्यानंतर इतर फळांचे भाव कमी होतात मात्र यंदा हापूस बाजारात आला असला तरी केळीचे दर कमी झाले नाही तर त्याला चांगलीच झळाली मिळाली आहे. गेल्या 15 दिवसाचा विचार करता केळीच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या दीड वर्षातील ही उच्चांकी वाढ असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये केळीला टनाला 15 ते 16 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी हेच दर 5 ते 6 हजार रुपये होते. येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हे दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगीतले जात आहेत. केळीच्या या दरामध्ये अजून वाढ होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांकडून होत आहे.
काय आहे दरवाढीचे कारण : डिसेंबर-जानेवारी महिन्यात मार्केट कमी होते. त्यामुळे केळीच्या दर अत्यंत कमी झाले. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रूपये खर्चून उभारलेल्या केळी बागांचे योग्य दर न मिळाल्याने मोठे नुकसान झाले. मिळणाऱ्या दराच्या तुलनेत काढणीचा खर्चही परवड नसल्याने शेतकऱ्यांनी केळी काढणी न करता केळीच्या बागाचा काढून टाकल्या. त्यामुळे सध्या मर्केटमध्ये केळीची आवक अत्यंत मंद गतीने सुरू आहे. सध्या केळीला चांगला दर मिळत असल्याने देशातील शीतगृह चालकांकडून केळी साठवणुकीसाठी प्राधान्य दिले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रायपनिंग चेंबर्समध्ये केळीची चणचण जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही ठराविक भागातच केळीचे क्षेत्र आहे. त्यामुळे बाजारात इतर राज्यातून केळी विक्रीसाठी येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
जुन्नर येथे उद्यापासून पर्यटन विभागाचा द्राक्ष महोत्सव
हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अहवाल खुला कराव : कृषीमंत्र दादाजी भुसे
पोहरा येथे शेळी समूह योजनेसाठी 7.81 कोटी मंजूर; उर्वरीत 5 प्रकल्पांना मान्यता
येणाऱ्यां हंगामासाठी खताचे अत्ताच नियोजन करा : कृषीमंत्री दादाजी भुसे
राज्यात ज्या भागात केळीचे क्षेत्र मोठे आहे त्या भागातील ज्या शेतकर्यांनी अजूनही बागा काढलेल्या नाहीत त्यांना मात्र या दरवाढीचा चांगलाच फायदा होणार आहे. गेल्या दीड वर्षातील ही विक्रमी दर वाढ असल्याने व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇