राज्यात जुलै महिन्यात मान्सून सक्रीय झाला असला तरी हंगामाच्या सुरवातीपासून कोकणासह मुंबईवर वरुणराजाची कृपादृष्टी ही राहिलेली आहे. राज्यात पाऊस सक्रिय होत असताना मुंबईमध्ये मात्र, जोर वाढला होता. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात 1 हजार 244 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या 10 वर्षात जुलै महिन्यात अशाप्रकारे विक्रमी पाऊस होण्याची ही चौथी वेळ आहे.
यंदा मान्सून नियमित वेळेपेक्षा तीन दिवस आगोदर बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार कोकण आणि मुंबई परिसरातच पावसाने हजेरी लावली उर्वरित राज्यात मात्र, खऱ्या अर्थाने 1 जुलैपासूनच पावसाला सुरवात झाली होती. तर याच दरम्यान, मुंबईमध्ये विक्रमी पाऊस पडला आहे.
आनंदाची बातमी : गोकुळ संघाकडून दूध खरेदी दरात वाढ
हवामान विभागाने गेल्या 10 वर्षात मुंबईत विक्रमी पावसाची नोंद होण्याची ही चौथी वेळ असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी 2020 सालच्या जुलै महिन्यात 1 हजार 502 मिमी पावसाची नोंद झाली होती, तर 2019 मध्ये 1 हजार 464.8 मिमी व 2014 मध्ये 1 हजार 468 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. तसं पाहिल तर जुलैमध्ये पावसाची सरासरीपेक्षा अधिक नोंद होत नाही. या महिन्याची सरासरी ही 919 मिमी एवढी आहे. पण यंदा ही सरासरी वरुणराजाने ओलांडली आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या सुरवातीच्या 12 दिवसांमध्येच पावसाने सरासरी ओलांडली होती.
लक्षवेधी बातमी : मराठवाड्यात शंखी गोगलगाय बरोबरच आता पैसा किटकांचे पिकावर संकट
यंदाच्या जुलै महिनन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असला तरी यामधील चार दिवस हे कोरडे गेलेले आहेत. म्हणजे जो काही पाऊस झाला आहे तो केवळ 26 दिवसांमध्ये पडला आहे. जुलै महिना संपल्यानंतर हवामान विभागाने जी माहिती समोर आणली त्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे. कोरडे दिवस म्हणजे त्या 24 तासांमध्ये 2.5 मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली असे दिवस हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑगस्टची सुरवात ही रिमझीम पावसानेच होणार आहे. 4 ऑगस्टपर्यंत मुंबईसह कोकण आणि परिसरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मात्र, जुलैमध्ये झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असला तरी खरीप हंगामातील पिकांचे नुकसानही झाले आहे.
मान्सून अपडेट : ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पाऊस
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1