सर्वसामान्याच्या जेवणाला झणझणीत चव आणाणाऱ्या मिरचीचा ठसका यंदा चांगलाच वाढला आहे. यंदा मिरचीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. मिरचीच्या या दरवाढीवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील मिरची उत्पादनात आग्रेसर असलेल्या नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान जागात मिरची उत्पादनात चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्थानातही यंदा पावसाने धुमाकूळ घातल्याने मिरची पीक उद्धस्त झाले आहे. यामुळे यंदा मिरचीचे दर विक्रमी राहणार असे चित्र असले तरी उत्पादन घटल्याने शेतकरी मात्र असमाधानीच आहेत.
मोठी बातमी : टाटा पॉवर उभारणार सोलापुरात सौर ऊर्जा प्रकल्प
राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदूरबारची ओळख आहे. दरवर्षी नंदूरबार जिल्ह्यात लाखो क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत असते. यावर्षी आतापर्यंत तीस हजार क्विंटलहून अधिक मिरचीची खरेदी झाली आहे. बाजार समितीत ओल्या मिरचीचे दर सरासरी प्रतिक्विंटल 8 हजारावर गेले आहेत. तर सर्वाधिक दर यंदा 12 हजार रुपये देण्यात आला आहे. दररोज शंभर ते दीडशे वाहनातून हजारो क्विंटल मिरची विक्रीसाठी नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. ओल्या लाल मिरचीचा दर अजून वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मिरचीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीही खराब झाली आहे. मिरचीला पावसाचे पाणी लागल्यानंतर मिरची काळी पडली आहे. त्यामुळे व्यापारी देखील देखील चिंतेत आहेत.
ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता..?
दरम्यान, मागील वर्षी नंदूरबार बाजार समितीत 2 हजार 500 ते 5 हजार पर्यंतचे दर होते. यावर्षी दर दुप्पट झाले आहेत. मिरचीचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांना मिरचीचा ठसका झोंबत आहे. या हंगामात 8 हजारापेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड नंदूरबार जिल्ह्यात करण्यात आली होती. मागील वर्षी देखील मिरचीला चांगला भाव मिळाला होता. यावर्षी देखील चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा करण्यात आली होती. मात्र सध्या चांगला भाव मिळून देखील उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असमाधानीचे वातावरण दिसून येत आहे. कारण नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे मिरीचीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे.

धुळे जिल्ह्यात दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार समजले जाते. दोंडाईचा बाजार समितीत आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून मिरचीची आवक होत आहे. रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे. एकीकडे लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले असताना दुसरीकडे मागणी वाढल्याने लाल मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.
मोठा निर्णय : ऊस तोडणी व वाहतूक खर्चाचे दरपत्रक जाहीर
दरम्यान, आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानला देशाला यावर्षी पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराच्या थैमानाने पाकिस्तानच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतले जाते. मिरची उत्पादन हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पाकिस्तानमधील 1 लाख 50 हजार एकर (60 हजार 700 हेक्टर) शेतात दरवर्षी 1 लाख 43 हजार 000 टन मिरचीचे उत्पादन होते. एवढ्या मोठ्या उत्पादनामुळे मिरचीच्या उत्पादनात पाकिस्तानचा जगात चौथा क्रमांक लागतो. मात्र पाकिस्तानातील प्रसिद्ध असलेल्या लाल मिरचीचे पीक यंदा पुरामुळे नष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा लाल मिरची अधिक महागण्याची शक्यता आहे.
आनंदाची बातमी : नागपूर येथे 25 ते 28 नोव्हेंबर ‘अॅग्रोव्हिजन’चे आयोजन

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/
