Chemical Fertilizers: रासायनिक खतांचा वापर 20 टक्क्यांनी कमी करा : डॉ. मांडवीया

0
356

Chemical Fertilizers : येणाऱ्या रब्बी हंगामात (rabi season) रासायनिक खते (chemical fertilizers) आणि कीटकनाशकांचा (Pesticides) वापर 20 टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी केले आहे.

नक्की वाचा : ई-पीक पाहणी सर्व्हरचा फज्जा

देशातील 500 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या (Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra) 1,000 हून अधिक शेतकर्‍यांशी मंत्री मनसुख मांडविया यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी रासायनिक खते (chemical fertilizers) आणि कीटकनाशकांच्या (Pesticides) अतिवापराचा धोका (Risk of overuse) स्पष्ट केला. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे  जमिनीची सुपीकता (Soil fertility) कमी होत चालली आहे. तसेच मानवी आरोग्यावर (human health) देखील त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता (concern) त्यांनी यावेळी व्यक्त केली.

येणाऱ्या रब्बी हंगामात (rabi season) रासायनिक खते (chemical fertilizers) आणि कीटकनाशकांचा वापर 20 टक्क्यांनी कमी करावा लागणार आहे. असल्याचे सांगून ते म्हणाले, जमिनीची सुपीकता आणि मानवी आरोग्याचे रक्षण (Protection of human health) करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) उत्पन्नाला चालना देण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत हाती घेतलेल्या उपक्रमांचे प्रदर्शन करण्यासाठी किसान समृद्धी महोत्सव (Kisan Prosperity Festival) कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सरकारची योजना असल्याचेहि त्यांनी यावेळी सांगितले.

मोठी बातमी : आता पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार पीक विमा

आता आपल्याला रासायनिक खतांचा वापर कमी करावा लागेल असे सांगून ते म्हणाले, आता नॅनो-लिक्विड युरिया, (Nano-Liquid Urea) नॅनो-लिक्विड डीएपी, Nano-Liquid DAP) बायो-फर्टिलायझर्स (Bio-fertilizers) आणि फॉस्फेट रिच ऑरगॅनिक खत (Phosphate rich organic fertilizer) सारखे पर्याय उपलब्ध आहेत. आपले पीक पोषक तत्वांनी बदलले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

देशात सध्या 150 लाख मेट्रिक टन खतांचा साठा (Fertilizer stock) उपलब्ध असल्याचे सांगून ते म्हणाले, देशात सध्या खतांची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळे चालू खरीपासह रब्बी हंगामाची शेतकऱ्यांची खतांची गरज भागणार आहे. नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि पर्यायी खतांना चालना देण्याच्या प्रगतीचा आढावाही मांडवीया यांनी यावेळी घेतला. वसुंधरेच्या रक्षणासाठी रासायनिक खतांचा अतिरेकी वापर कमी करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणाऱ्या वन-स्टॉप-शॉप (A one-stop-shop) म्हणून काम करणाऱ्या देशभरातील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांच्या (Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra) उपक्रमावर देखील त्यांनी यावेळी चर्चा केली.

नक्की वाचा : बैलांची संख्या का घटली ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here