रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जमिनीवर रासायनिक खताचा होणारा दुष्परिणाम कमी करण्याची गरज आहे. रासायनिक खताशिवाय कृषी आणि मृदा उत्पादकता वाढवण्यासाठी वैज्ञानिक उपाय शोधण्याची जबाबदारी कृषी वैज्ञानिकांची आहे. असे मत केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केले.
नक्की वाचा : ई-केवायसी अभावी शेतकरी अवकाळीच्या नुकसान भरपाईपासून वंचित
मृदा आरोग्य आणि जमिनीच्या शाश्वत सुपिकतेसाठी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी पोषकांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणासंदर्भात डॉ. मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

सध्या शेतीमध्ये पोषक तत्वांचा गरजेपेक्षा अधिक आणि बेसुमार वापर होत असल्याचे सांगून, डॉ. मांडवीय म्हणाले, त्यामुळे जमिनीची सुपिकता आणि उत्पादन क्षमता कमी झाली आहे. म्हणूनच कृषी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांनी आणि सरकारने एकत्रित काम करुन, जमिनीवर रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज आहे.
रासायनिक खतांचा बेसुमार वापर होणाऱ्या भागात आज वाढत्या आजारांचा सामना करावा लागत असल्याचे सांगून ते म्हणाले, कृषी उत्पन्न वाढवणे ही आपली जबाबदारी आहे; मात्र त्याचवेळी आपल्याला संपूर्ण कृषी व्यवस्था अशाप्रकारे मजबूत करायची आहे, जेणेकरुन, आपल्याला जमिनीच्या कसाबाबत तडजोड करावी लागणार नाही. तसेच आपल्या नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होणार नाही. हे सांगताना असे त्यांनी देशातील कृषी वैज्ञानिकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि जबाबदारीही अधोरेखीत केली.
हेही वाचा : जिऱ्याची फोडणी महागली : दर 55 हजारांवर
ते म्हणाले, वैज्ञानिक आणि त्यांनी देशाला दिलेले योगदान यांचा आम्हाला अभिमान आहे. मात्र आता, कृषी तसेच मृदा उत्पादकता या दोन्ही क्षेत्रातील समस्यांवर उपाययोजना करत लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे ही वैज्ञानिकांची जबाबदारी आहे. या उपाययोजना अशा असायला हव्यात, की त्या शेतकऱ्यांना देखील सहज समजतील आणि त्यांनाच त्याची अंमलबजावणी करता येईल, असे मांडवीय म्हणाले.
यावेळी बोलताना नीती आयोगाचे सदस्य, प्रा. रमेश चंद म्हणाले, रासायनिक खते वापरण्यास सुलभ आहेत म्हणूनच, लोक त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच, या कार्यशाळेचा उपयोग आपण भारतात शेतीमध्ये शाश्वत पद्धतींचा वापर वाढवण्यासाठीच्या चर्चेसाठी करणे महत्वाचे आहे.
यावेळी खते विभागाचे सचिव, रजत कुमार मिश्रा यांनी केंद्र सरकारने कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्याचवेळी, जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा म्हणाले, देशात खतांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे रासायनिक खतांमुळे होणारी हानी भरून काढू शकतील अशा शाश्वत कृषी पद्धतींची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मोठी घोषणा : तर… पेट्रोल 15 रुपये लिटर दराने मिळेल !

https://www.facebook.com/shetimitramagazine03