नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची आरबी समुद्रातील विश्रांती संपली असून, आज सहा दिवसानंतर मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. श्रीलंकेच्या निम्म्या भागासह, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने चांगली हजेरी लावली आहे.

यंदा अंदमानात मान्सून ठरलेल्या वेळेआधी दाखल झाला आहे. १६ मे रोजी अंदमानात आगमन झालेल्या मान्सूनने वेगाने वाटचाल करत ता. १८ मे रोजी संपुर्ण अंदमान-निकोबार बेटसमुह व्यापला आहे. तर २० मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातूनही मान्सूनने वाटचाल सुरू केली. मात्र त्यानंतर मान्सून वाऱ्यांची पुढील प्रगती मंदावली होती. आज पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे.
लक्षवेधी बातमी : लाल मिरचीचा ठसका !
आज मान्सूनने श्रीलंका देशाच्या निम्मा भाग व्यापला आहे. तसेच नैर्ऋत्य व अग्नेय अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, भारताच्या दक्षिणेकडील आणि श्रीलंकेच्या पश्चिमेकडील कोमोरिन भाग, तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने धडाक्यात प्रवेश केली आहे.
ब्रेकिंग न्यूज : मराठवाड्यातील 60 पैकी 28 कारखान्यांचे गाळप थांबले
सध्या पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. २८) मान्सून दक्षिण अरबी समुद्र, संपुर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मान्सूनच्या केरळातील आगमनाचेही हवामान विभागाकडून निरीक्षण सुरू आहे.
महत्त्वाची बातमी : राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1