गाईच्या दुधाला प्रति लिटर 75 तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 125 रुपये भाव मिळाला पाहिजे नाहीतर किमान देशी दारूची जेवढी किंमत तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या, अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयतक्रांती संघटनेचा शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
ब्रेकिंग न्यूज : पाणी टंचाईची तिव्रता वाढली : राज्यात 426 टँकर सुरू
22 मे रोजी पुण्यामध्ये दुधाच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून यात्रा काढली होती. त्यावरून दुग्धविकास मंत्रालयाने बैठक बोलवली आहे. त्या पार्श्वभूमीवर खोत बोलत होते. ते म्हणाले, गाईच्या दुधाला प्रति लिटर 75 तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 125 रुपये प्रति लिटरला भाव देणे अवघड नाही. महागाई वगैरे काही वाढत नाही उलट शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित कमी होईल.

सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर भविष्य उज्वल असेल, असे सांगून सदाभाऊ खोत म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावे. शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आहे. शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारले तर शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे. हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
ब्रेकिंग : आज विदर्भात उष्णतेची लाट : मराठवाड्यात तुरळक पाऊस
शेतकऱ्यांकडे अनेक समस्या असल्याचे सांगून सदाभाऊ खोत म्हणाले, इथल्या साखर कारखानदारांने शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पैसे दिले नाहीत. ते पैसे शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्या पोराला आणि शेतकऱ्याला आम्ही जागे करणार आहोत. पेरणी हंगाम तोंडावर आलेला आहे. जर 30 जूनपर्यंत पैसे दिले नाहीत तर एक जुलै रोजी साखर कारखान्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. त्यावरही कारखान्याने पैसे नाही दिले तर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल, असे सदाभाऊ खोत यांनी यावेळी जाहीर केले.
मोठी बातमी : पीएम किसानच्या कार्यपद्धतीत बदल : कृषी व महसूलमध्ये कामाचे वाटप

https://www.facebook.com/shetimitramagazine03