राज्यातील शेतकरी, युवक, शेतमजून यांच्यासमोर असलेल्या अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सादभाऊ खोत हे उद्या, 29 एप्रिलपासून जागर शेतकऱ्यांचा, अक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाला सुरूवात करणार आहेत. अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता 23 मे रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात होणार आहे. या अभियानात आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे नक्की वाचा : ४ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली : कृषिमंत्री तोमर
या अभियानाला कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. या अभियानात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून चर्चा करणार असल्याचे सांगून खोत म्हणाले, गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. परंतू राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप करत आहे.

लक्षवेधी बातमी : इंडोनेशियाचा निर्यात बंदीचा निर्णय : खाद्यतेल अजून भडकणार
आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. लोडशेडींग, अतिरिक्त ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, विज बिलमाफी, शैक्षणिक समस्या, रखडलेल्या भरती, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, पेट्रोल डिझेल, दरवाढ, अतिवृष्टी, वादळ, महापुर, दुष्काळ, रासायनिक खत टंचाई, बोगस बियाणे, शेतमाल हमीभाव या समस्या आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.
आनंदाची बातमी : नाशिक येथे 2 मे रोजी कृषि पुरस्कारांनी 198 शेतकऱ्यांचा होणार सन्मान !
या अभियानात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बोलावले तरी मी त्यांच्याजवळ जाणार आहे. तसेच भाजपचे आमदार, घटक पक्षाचे कार्यकर्ते यांच्याबरोबर देखील चर्चा करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. या अभियानात शेतकऱ्यांचे, तरुणांचे, व्यवसायिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दिवसातून तीन चार बैठका घेणे, तसेच पत्रकार परिषदा घेणार आहोत. तसेच दिवसातून एक दोन गावात जाहीर सभा घेणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : शेतकरी आत्महत्येची धक्कदायक आकडेवारी आली समोर
23 मे पर्यंत हे अभियान चालणार असून, 23 मे ला तुळजापुरात तुळजा भवानीचे दर्शन घेऊन घोषवारा मांडण्यात येणार आहे. तसेच या अभियानाचा समारोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात होणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले.
नक्की वाचा : सोलापुरातील किसान रेल्वे आठवड्यापासून बंद

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1