उष्णता अजून वाढणार : स्कॉटलंडच्या हवामान शास्त्रज्ञाचा भारताला गंभीर इशारा

0
408

गेल्या दोन तीन वर्षापासून उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ होत आहे. याची कारण मिमांसा करताना ग्लोबल वार्मिंग, हवामानतील बदल, कार्बन उत्सर्जन अशी कारणे सांगितली जातात. यंदा त्याची खरी प्रचिती दिसून आली आहे. यंदा महाराष्ट्रातील अनेक शहरातील तापमान 44 अंशाच्या पुढे गेले आहे. पुर्वी महाराष्ट्रातील ठरावीक नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात तापमानाचा पारा वर असायचा मात्र यंदा सोलापूर, जळगाव, नाशिक आणि ठाणे याशहरातील तापमानात कमालीची वाढ झालेली दिसून आली. प्रत्येक वर्षी तापमानाचा पारा एक ते दोन अंशाने वाढताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर येणाऱ्या मे आणि जून मन्यिात हवामानाची स्थिती कशी राहील याबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

महत्त्वाची बातमी : आता अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण शक्य ?

येणाऱ्या मे आणि जून महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचं संकट अधिक भयानक होण्याची शक्यता आहे. या दोन्ही महिन्यात इतर महिन्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात उष्णता जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामध्ये स्कॉटलंडमधील हवामान शास्त्रज्ञ स्कॉट डंकन यांनी याबाबत इशारा देताना भारत आणि पाकिस्तान या देशामध्ये अत्यंत धोकादायक अशी उष्णतेची लाट वाढत असल्याचे म्हटले आहे.

हे नक्की वाचा : बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ब्रेक द लाईफस्टाईल नवी संकल्पना

टीव्ही नाईन हिंदी ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये तीव्र उष्णता  जाणवत असून, बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र झालेली आहे. या तुलनेमध्ये येणाऱ्या मे आणि जून महिन्यात अधिक तीव्र उष्णतेची लाट येऊ शकते असा इशारा देखील हवामान तज्ञांनी दिला आहे.

स्कॉटलंड चे हवामान तज्ञ स्कॉट डंकन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एका थ्रेडमध्ये म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानच्या दिशेने धोकादायक अशी उष्णतेची लाट वाढत आहे. येत्या काही दिवसात तापमान उच्चांकी वाढ  होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान मधील काही भागात पारा 50 अंश सेल्सिअस पर्यंत वाढू शकतो. जर जागतिक तापमानाचा विचार केला तर दरवर्षी सरासरी एक अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होत आहे.

आनंदाची बातमी : देशी गायींच्या देखभालीसाठी दरमहा मिळणार ९०० रुपये !

कोरोना कालावधीमध्ये जगभरातील अनेक देशांमध्ये बरेच प्रकल्प आणि कारखाने बंद होते. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ देखील बंद होती. या कारणांमुळे कार्बन-डाय-ऑक्साइडचे उत्सर्जनात मोठी घट झाली होती. परंतु हे निर्बंध हटवले गेल्यानंतर यामध्ये उच्चांकी वाढ झाल्याने आता तापमान कमी होण्यासाठी डीकार्बनायजेशनची   गरज आहे. असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पुढे स्कॉट यांनी म्हटले आहे की, जसजशी आपल्या ग्रहांचे तापमान वाढते तस-तशी उष्णतेची लाट अधिक तीव्र होते. या भागांमध्ये वर्षातला बहुतांश काळ सर्वाधिक उष्णता जाणवते. त्यामुळे येणारा काळ अधिक उष्णतेचा राहणार आहे.

नक्की वाचा : किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here