राज्यात बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जालना येथे बियाणे पार्क उभारण्याचे प्रस्तावित असून, याअंतर्गत लहान कंपन्यांना सुद्धा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.
मोठी बातमी : नाफेडने कांदा किमान 1200 रुपयांनी खरेदी करावा : शरद पवार
ते म्हणाले, यासाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध आहे. याअंतर्गत लहान कंपन्यांना सुद्धा उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाच्या जागेवर सवलतीच्या दरात जागा देता येईल का, याबाबत विचार करणार येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बियाणे पार्क उभारण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सांगून ते म्हणाले, या समितीच्या अहवालानंतर डिसेंबर 2023 अखेरपर्यंत या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात देखील बियाणे पार्क उभारण्याबाबत समिती स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हे नक्की वाचा : फडणवीसांच्या आश्वासनानंतरही नाफेडकडून कांद्याची खरेदी नाही
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1