Seed Park : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारणार : कृषीमंत्री धनंजय मुंडे

0
358

Seed Park Project : गेल्या 5 वर्षापासून निधी अभावी रखडलेला जालना येथील सीड पार्क प्रकल्प लवकरच उभारला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत महाबीजकडून प्रकल्प आराखडा कृषी सचिवांना सादर करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधानपरिषदेत बोलताना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची तयारी असल्याची माहिती दिली आहे.

गुडन्यूज : पीक विमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ

राज्यातील बियाणे उद्योग तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये स्थलांतरित होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सचिन अहीर (sachin Ahir) यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कृषीमंत्री मुंडे यांनी ही महिती दिली आहे.

सध्या भाजीपाला आणि विविध पिकांच्या बिजोत्पादनाचा कार्यक्रम शेतकरी राबवत आहेत. शेतकऱ्यांबरोबर शेतकरी कंपन्याही यामध्ये उतरल्या आहेत. मात्र, शेतकरी हे केवळ बिजोत्पादनापुरतेच (Seed Production) मर्यादित न राहता बियाणे उद्योजक व्हावेत याच अनुशंगाने सीड पार्क उभारला जाणार आहे. या सीड पार्कमध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा राहणार आहेत. बियाणावर (seeds) प्रक्रिया कामी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहेत. एकाच छताखाली सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी 85 कोटी रुपये मंजूरही करण्यात आले आहेत.

मोठी घोषणा : हमीभावासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाची निर्मिती : कृषिमंत्री धनंजय मुंडे

सीड पार्क संदर्भात बोलताना कृषीमंत्री मुंडे म्हणाले, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची तयारी आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यात सन 2019 मध्ये 654 बियाणे कंपन्या (seeds companies) कार्यरत होत्या. सध्या 1580 कापूस व इतर बियाणे कंपन्या कार्यरत आहेत. महाबीजचे बळकटीकरण करणार असल्याचेही कृषी मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले. सीड पार्क संदर्भात झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

नक्की वाचा : जळगाव जिल्ह्यात 628 शेतकऱ्यांना बोगस खताचा फटका

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here