सोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरात आंबा महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात अडीच किलोच्या वजनामुळे आणि शरद पवार यांचे नाव दिलेला शरद मँगो ग्राहकांचे प्रमुख आकर्षण ठरला आहे. अरण येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी हा अडीच किलोचा आंबा या महोत्सव आणला आहे.
आनंदाची बातमी : पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये देणार : कृषिमंत्री
अरण येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत अडीच किलोच्या आंब्याचे उत्पादन घेतले आहे. गाडगे यांच्या बागेत अडीच किलो आंब्याची जवळपास 25 झाडे आहेत आणि या आंब्याला त्यांनी शरद मँगो म्हणजेच शरद पवार आंबा, असे नाव दिले आहे. त्यामुळे महोत्सव शरद मँगो ग्राहकांचे प्रमुख आकर्षण ठरला आहे. आंबा अडीच किलोचा असल्याने आंबा महोत्सवात येणारे ग्राहक शरद मँगोकडे अधिक आकर्षित होत आहेत. विशेषत: या शरद आंब्याला ग्राहकांकडून अधिक मागणी होत आहे.
या आंब्याला शरद पवार यांचे नाव का ठेवले ? याबाबत बोलताना शेतकरी दत्तात्रय घाडगे सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी राज्यात फळबाग योजना आणली. त्याच योजनेतून आम्ही 8 एकर क्षेत्रावर सर्वसाधारण 7 हजार केशर आंब्याची रोपे लावली. शरद पवार यांनी सुरु केलेल्या फळबाग योजनेमुळे हे शक्य झाले. त्यामुळे आम्ही या अडीच किलोच्या आंब्याला शरद पवार म्हणजेच शरद मँगो, असे नाव दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ब्रेकिंग न्यूज : तुर्की बाजरीची सध्या जोरदार चर्चा !
या अडीच किलोच्या आंबा उत्पादनाबाबत बोलताना ते म्हणाले, अडीच किलोचा आंबा उत्पादन करण्यासाठी आम्ही एकाच झाडावर कलम करून विविध प्रकारचे आंबे घेतले. त्यामध्ये केशर आंब्याच्या झाडावर विविध प्रयोग केले. होमिओपॅथीच्या विविध औषधांचा वापर यासाठी केला आहे.
या आंब्याचे वजन आणि आकारमान वाढविण्याच्या दृष्टीने आंब्यामधील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही बारामती येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेतले असल्याचे सांगून दत्तात्रय घाडगे म्हणाले, यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि बारामती अग्रिकल्चर डेव्हलोपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी याबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे घाडगे यांनी सांगितले.
डख अंदाज : या तारखेला होणार मान्सूनचे आगमन !
पुढे बोलताना घाडगे म्हणाले, गेल्या 5 वर्षांपासून बारामती कृषी विज्ञान केंद्रातील कृषी शास्त्रज्ञांच्या निरीक्षणाखाली या आंब्यावर होमिओपॅथी खते आणि औषधांचा अभ्यास करून याची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु होता.
बारामती अग्रिकल्चर डेव्हलोपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार आणि डॉ. वीरेंद्र कुमार पाटील यांच्या अथक परिश्रमाने आंबा पिकावर होमिओपॅथी औषधांचा वापर करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आणि अडीच किलो वजनी आंब्याचे भरघोस उत्पादन सुरु झाले. जुळे सोलापूर परिसरात सुरु असलेल्या या आंबा महोत्सव बारामती कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी भेट दिली. आणि या अडीच किलोच्या आंब्याला शरद पवार यांचे नाव देत शरद मँगो, असे नामकरण केले, असल्याचे घाडगे यांनी सांगितले.
ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1