सततचा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. यातूनही चुकून समाधानकारक पाऊसपाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात. काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निर्सगावर अवलंबून असलेला हंगाम हातून जातो. त्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. नुकताच 30 मार्चपर्यंत पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अहवाल समोर आला आहे. विभागीय उपायुक्तांचा हा अहवाल सरकारसमोर सादर झाला आहे.
नक्की वाचा : सोलापुरातील किसान रेल्वे आठवड्यापासून बंद
कर्ज काढून पेरणी करणे, पीक वाचविण्यासाठी अथक मेहनत करूनही कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही यामुळे शेतकरी कमालीचे अडचणीत आले. या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी, याचा सामना नेहमीच करावा लागतो. त्यामुळे या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
हे वाचा : उन्हाळ पिकांच्या लागवडीत 7 टक्क्यांनी वाढ
या अहवालात पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होताना दिसत आहे. ३० मार्चपर्यंत म्हणजेच या ९० दिवसात जवळजवळ २७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालानुसार दर आठ तासांनी एक शेतकरी आत्महत्येला बळी पडत आहे. राज्यात सगळ्यात जास्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या होत असताना दिसत आहेत. तब्बल 80 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्याची नोंद झाली आहे.
हे नक्की वाचा : ड्रोन फवारणीसाठी 477 कीडनाशकांना केंद्रांची मंजुरी
मागील वर्षी 1,173 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मागील काही महिन्यांपासून ही संख्या वाढताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात 88, फेब्रुवारी महिन्यात 109 तर मार्च महिन्यात 82 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. ओढवलेल्या परिस्थितीला तोंड देत शेतकरी जगत आहे. मात्र कुटूंबाची जबाबदारी, मुलामुलींचे शिक्षण, मुलीचे लग्न, अशा एक ना अनेक गोष्टींचा त्यांना सामना करावा लागत आहे.
हे वाचा : रोजगार हमीसाठी गावपातळीवर स्वतंत्र यंत्रणा ?
शेतकऱ्यांसाठी योजना असताना त्याचा बऱ्याच गरजू शेतकऱ्यांना फायदा होत नाही. यंदाच्या अवकाळी पावसाने शेतकरी बंधूंचे बरेच नुकसान केले. अचानक झालेल्या पावसामुळे हंगामी पिकांचे बरेच नुकसान होऊन त्या पिकांचा दर्जा खालावला. त्यातून शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. या गोष्टींमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
महत्त्वाचे वृत्त : रायगड जिल्ह्यातील 26 हजार लोक पीएम किसानसाठी अपात्र
महसूल विभागाकडे शेतकरी आत्महत्येच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यांच्या आकडेवारीनुसार 2001 पासून पश्चिम विदर्भात तब्बल 17,938 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद आहे. यातील 8,166 जणांना शासनाकडून मदत मिळाली. तर 9,535 प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली. तर 237 प्रकरणे प्रलंबित करण्यात आलेली आहेत.
हेही वाचा : खारीपासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा वेळेत द्या : कृषीमंत्री दादाजी भुसे
केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते की, भारतात 2019 या वर्षात 5,957 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 2018 मध्ये हा आकडा 5,763 होता. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये सांगितले की, 2019 मध्ये दर तीन तासांनी सरासरी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
महत्त्वाचा निणर्य : कृषी खात्यातील योजनांचे नियोजन आता एप्रिलपासून
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1