यंदा मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याची चर्चा सुरू असतानाच संयुक्त राष्ट्र जागतिक हवामान संस्थेने जागतिक तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच वर्षात जागतिक तापमानात सरासरी 1.5 अंश सेल्सियसने वाढ होईल, असा धक्कादायक अहवाल नुकताच संयुक्त राष्ट्र जागतिक हवामान संघटनेने दिला आहे.
आनंदाची बातमी : केळी महामंडळाची लवकरच होणार निर्मिती
भारतीय उपखंडातील भारत, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये यंदा उष्णतेच्या लाटांचा कहर सुरू असून, हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच येत्या पाच वर्षात उष्णतेतही वाढ होऊन जागतिक सरासरी तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढणार आहे., असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे. त्यासाठी मागील 30 वर्षातील सरासरी जागतिक तापमानाच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे.
भारतीय शेतकऱ्यांना या तापमान वाढीची झळ सर्वाधिक बसू शकते. तापमानातील वाढ पिकांवर प्रतिकूल परिणाम करते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान वाढण्याची शक्यता आहे. कमी उष्णतेमध्ये येणाऱ्या पिकाबरोबरच कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला व फळवर्गीय पिकावरही याचा मोठा परिणाम होणार आहे.
ब्रेकिंग : बैलगाडा शर्यतीचे हे आहेत नवे नियम
2023 ते 2028 यांपैकी एक वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंदवले जाणार आहे. 2016 वर्ष आतापर्यंत सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले होते. यंदा एल निनोला अनुकूल स्थिती असल्याची चर्चा आहे. तसेच यंदाचे नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशात तीन ते चार दिवस अगोदर दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
तापमान वाढीमुळे अतिरिक्त पाऊस, बर्फ वितळण्याच्या घटना, उष्णतेची लाट आणि दुष्काळ अशा घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे पुढील पाच वर्षात तापमाना वाढ होऊन अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
जागतिक सरासरी तापमानात 1.5 अंश सेल्सिअस वाढण्यास काही प्रमाणात एल निनो कारणीभूत असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे. विषुवृत्तीय प्रशांत महासागरात एल निनोला अनुकूल झाल्यास भारतातील मॉन्सूनवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे देशात उष्णतेत वाढ होऊन पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा : गोकुळच्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची वर्णी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1