राज्यात परतीच्या पावसाने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास परतीच्या पावसाने हिरावून घेतली आहेत. मराठावडा आणि विदर्भाला या परतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. औरंगाबाद येथे जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
मोठी बातमी : आमदार कैलास पाटील उपोषणाला वाढता पाठिंबा : शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक
औरंगाबाद जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, या मागणीसाठी आंदोलन केले.

मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून शेतकऱ्यांची पिके ही पूर्णपणे वाया गेली आहेत. अशातच शेतकऱ्यांना मदत तर मिळाली नाही. अद्याप नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले नाहीत. दिवाळी झाली तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांना काही मदत दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी औरंगाबाद येथील पाण्याच्या टाकीवर चढून जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ शोले स्टाईलने हे आंदोलन करण्यात आले. मदत न दिल्यास पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.
ब्रेकिंग : ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलनाला पंढरपुरात हिंसक वळण
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एवढे मोठे नुकसान झालेले असताना कोणीच लक्ष देत नसल्याची माहिती जनहीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. पालकमंत्री संदिपान भुमरे हे औरंगाबादचे आहेत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील असूनही शेतकऱ्यांनी न्याया मिळत नाही. एवढे आमदार खासदार मंत्री असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होते नाहीत, मदत मिळत नाही, त्यामुळे शेतकरी संकटता आहे. लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांच्या हातात काहीच नसल्याची माहिती जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

आज शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तसेच दुसरीकडे पोलिस बांधवांना दिवाळी बोनस नाही, सुट्ट्या नाहीत, त्यांच्या 39 मागण्या प्रलंबित आहे, त्याचीही दखल शासनाने अद्याप घेतली नाही. सरकारने जर शेतकरी आणि पोलिस बांधवांची दखल घेतली नाहीतर आम्ही आणखी आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिली आहे.
मोठी बातमी : गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागू : कृषीमंत्री सत्तार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1