Onion And Garlic Price Hike : कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने सध्या मुंबईकरांचे संकट वाढवले आहे. जेवणाला चविष्ट बनवणाऱ्या या दोन महत्त्वाच्या जिन्नसच गायब झाल्याने मुंबईकरांच्या जीभेची चव हरवली आहे. तुटवड्यामुळे कांदा आणि लसणाच्या किंमती भडकल्या आहेत.
कांदा आणि लसणाने ऐन निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढवले आहे. मुंबईत कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या पेस्टने रोजच्या जेवणाला रंगत येते. ते रूचकर आणि चविष्ट लागते. पण या दोन महत्त्वाच्या जिन्नसच हरवल्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने किंमती वाढल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईतील बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कांदा 80 रुपये किलोवर तर लसूण 400 रुपये किलोवर गेला आहे. मुंबईत किरकोळ बाजारात कांदा 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. पुढील महिनाभर कांद्याचे आणि तीन – चार महिने लसणाचे वाढ चढेच राहणार आहेत.
दिवाळीनिमित्त नाशिक परिसरात कांद्याची खरेदी – विक्री आठवडाभर बंद होती. परिणामी बाजारांत काद्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. किरकोळ प्रमाणात दोन ते पाच टक्के उन्हाळी कांदा शेतकर्यांकडे शिल्लक आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुणे, मुंबईसह राजधानी दिल्लीत दर्जेदार कांद्याचे दर 80 रुपयांवर गेले आहेत. खरीप हंगामातील नुकताच काढलेला, पाण्याचे प्रमाण जास्त असलेला कांदा 60 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
कांद्याचे भाव आणखी महिनाभर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुद्धा कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्याने हा तुटवडा जाणवत आहे. यंदा पावसाने कांद्या मोठ्या प्रमाणात खराब केला आहे. खरीप कांद्याच्या काढणीवर त्याचा परिणाम दिसून आला. उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा आला आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇