Swabhimani Association : ऊस गळीत हंगाम (Sugarcane sieving season) सुरू होण्यापूर्वीच यावर्षी वादाची ठिणगी पडलीय. राज्यातील ऊस इतर राज्यात नेण्यास सरकारने बंदी घातल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Farmers Association) नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) अक्रामक झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षानेही सरकारला कोंडीत पकडलय. त्यामुळे यावर्षीचा ऊस हंगाम वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : चांगला दर मिळेल तिथे आम्ही ऊस घालू : स्वाभिमानीची भूमिका
यंदाच्या हंगामात उसाचे पीक कमी झाले आहे. त्यामुळे गळीत हंगामही अडीच ते तीन महिनेच सुरू राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती ऊसाची पळवा पळवी होऊ शकते. पण चांगला दर मिळेल तिथं आम्ही ऊस देणार, तुम्ही अडवून दाखवा असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार (Rajesh Kumar) यांनी राज्याबाहेर ऊस घालता येणार नाही याबाबतचे आदेश काढले आहेत. यंदाच्या हंगामात राज्यात उसाचे पीक (Sugarcane Crop) खूप कमी झाले आहे. त्यामुळे गळीत हंगाम (sieving season) जेमतेम अडीच ते तीन महिने सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणूनच सरकारने राज्याबाहेरील कारखान्यांना ऊस देण्यास बंदी घातली आहे.
महत्त्वाची बातमी : मराठवाड्यातला दुष्काळ हटविण्यासाठी 46 हजार कोटीचा निधी
राज्यात यावर्षी अवकाळी पाऊस पाऊस (Rain) आणि दुष्काळी स्थिती (Drought Status) यामुळे ऊस उत्पादनात घट झालीय. त्यामुळे साखर कारखान्यांची धुराडी पेटली तरी कारखान्यांना ऊस मिळणे जिकरीचे होणार आहे. त्यातून ऊस (Sugarcane) मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाल्यास यावर्षीच्या उसाला चांगला भाव मिळणार आहे. राज्यात जर उसाला भाव चांगला मिळाला नाही तर इतर राज्यात ऊस घालण्याचा पर्याय यातून शेतकऱ्यांना होता मात्र त्याच पर्यायावर सरकारने बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या निर्णयाला राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध (strong opposition) दर्शवला आहे.
साखर पट्यातले शेतकरी उसाला भाव मिळेल त्या कारखान्याला ऊस घालण्यास प्राधान्य देतात त्यामुळे कर्नाटकातील काही कारखान्यांना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ऊस घालत होते. मात्र आता त्यावर निर्बंध येणार आहे. त्यामुळे सरकारने राज्यातच शेतकऱ्यांना चांगला भाव द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
ब्रेकिंग : यंदा राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी

https://www.facebook.com/shetimitramagazine03