गायीचे डोहाळे जेवण ही संकल्पनाच मुळात वेड्यात काढायला लावणारी आहे. मात्र ही संकल्पना नुकतीच सत्यात उतरली नव्हे तर या शाही डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात भजन आणि किर्तनाचा कार्यक्रमही झाला. या गायीच्या डोहाळे जेवणाची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये गायीला पूजनीय आहे. म्हणूनच गायीला गोमात असेही म्हणतात. अनेक सणावारामध्ये गोमातेला वेगळे महत्त्व असून शेतीमध्ये अनेक कारणांमुळे गोमाता उपयुक्त ठरते. अशा या गोमातेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी करण्यासाठी काल शिवरात्रीच्या मुहूर्तावर आळसंद (ता. खानापूर, जि. सांगली) येथे डोळ्याचे पारणे फिटेल असा गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम रंगला. या निमित्त भजन, कीर्तन असे अनेक कार्यक्रम झाल्याने या कार्यक्रमाची चर्चा पंचक्रुशीत झाली आणि आता याची चर्चा राज्यभर सुरू आहे.

त्याचे असे झाले की, आळसंद येथील माजी सरपंच भगवान हारुगडे यांच्या कुटुंबियांनी शिवरात्रीचा मूहुर्तावर गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. सर्वकाही विधीवत कार्यक्रमक करण्यात आला. सकाळी गायीची पूजा करून तिला फुलांनी सजविण्यात आले. गावातील महिलांनी हळदी-कुंकू लावून गायीची पूजा करेली. यानिमित्ताने जेवणाच्या पंगतीही उढवण्यात आल्या. गावातील प्रत्येक कुटुंब या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी गायीचे नामकरणही करण्यात आले. यावेळी महिलांनी या गायीचे नाव लक्ष्मी असे ठेवले. दरम्यान यानिमित्ताने भजनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रमही करण्यात आला.
हेही वाचा
शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा ऊर्जामंत्र्यांचा इशारा
आजपासून गाईच्या दुधाला मिळणार 30 रुपये खरेदी दर !

यासंदर्भात बोलताना सुशांत हारुगडे यांनी सांगितले की, आमच्या आजीची इच्छा होती की आपल्या अंगणात एक तरी गाय हवी आहे. त्यामुळे मी माझ्या मित्राकडून ही गाय आणली. तीच्यावर आमच्या घरातील प्रत्येकाने जिवापाड प्रेम केले आहे. आमच्या घरातील एक सदस्य म्हणूनच आम्ही तीच्याकडे पहातो, तीची काळजीही घेतो. त्यामुळे आम्ही ठरवून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाय या कार्यक्रमामुळे आपल्या संस्कृतीतील गायीचे महत्त्वही गावकऱ्यांना समजून येईल, हाही त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा