हवामानाचा विश्वासार्ह अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने यंदाचा प्रथमिक हवामान अंदाज जाहीर केला आहे. ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला मात्र अवकाळी पवसाने मोठे नुकसान केले. यंदा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊस पडणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

स्कायमेटनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2022 मध्ये भारतात मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस राहणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षांतल्या पावसावर अल निनो या वादळाचा परिणाम होता. पण यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तेवढा परिणाम राहणार नाही. तसंच प्रशांत महासागरातही मान्सूनला अडथळा ठरणारं वातावरण तयार झालं होतं, त्याची तीव्रताही हळूहळू निवळते आहे त्यामुळे यंदा पाऊस सामान्य असणार आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्र ‘टॉपवर’
राजापूरी हळदीच्या दरात तेजी सुरू
एचटीबीटी कापूस उत्पादनाला मिळणार लवकरच परवानगी
या कारणामुळे ढासळणार कांद्याचे दर !
नुकसानभरपाईचा 773 कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी वितरित
एप्रिल महिन्यात मान्सून संदर्भात अधिक सविस्तर रिपोर्ट देण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं. मान्सूनमध्ये अजूनतरी कोणतेही अडथळे दिसत नाही असं म्हटलं आहे. मान्सूनचा प्रवास कसा असेल आणि कधी सुरू होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच येईल असंही त्यांनी सांगितलं.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇