केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वांना आश्चर्य वाटेल असे विधान केले आहे. ते म्हणाले, सध्या 100 रुपये लिटरच्या आसपास विकले जाणारे पेट्रोल सरकारच्या एका उद्दीष्ट्यानंतर 15 रुपये लिटर दराने मिळू शकेल !
महत्त्वाचे : शेतकऱ्यांच्या अडचणी निवारण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापन
सध्या देशातील शेतकऱ्यांना अन्नदाता म्हटले जाते असे सांगून गडकरी म्हणाले, मात्र आमचे सरकार त्यांना ऊर्जा देणारे बनविण्याच्या योजनेवर काम करत आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या ऊस आणि इतर पिकांपासून इथेनॉल तयार केले जात आहे.

सध्या आपण सुमारे 16 लाख कोटी रुपये आयातीवर खर्च करत आहोत. हा पैसा वाचेल आणि तो पैसा शेतकऱ्यांच्या घरी जाईल. सध्या आपण पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. आम्ही हळूहळू त्यात वाढ करणार आहोत.
नक्की वाचा : खुद्द कृषी आयुक्तांनी सांगितली… राज्यातील खरीपाची सध्यस्थिती
पिकांपासून इथेनॉल तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा नक्कीच होईल. असे सांगून ते म्हणाले, या मुळे शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल आणि त्यांची मागणीही वाढेल. मात्र सरकारचे एक उद्दिष्ट पूर्ण झाले तर हे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.
60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास पेट्रोलचे दर 15 रुपयांपर्यंत खाली येतील, असा दावा गडकरी यांनी केला आहे. आता हे प्रत्यक्षात कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठी घोषणा : राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर : 8 हजार 562 कोटीची मान्यता

https://www.facebook.com/shetimitramagazine03