सौर कुंपण : शेताची रात्रंदिवस देखभाल शक्य

0
825

वाढत्या चोर्‍यांचे प्रमाण आणि दरवर्षी करावे लागणारे काटेरी कुंपण यामुळे भारतीय शेतकरी त्रस्त झाला आहे. मोकाट गुरांमुळे होणारे शेतमालाचे नुकसान व शेतबागेतील चोर्‍याबद्दल तर विचारच करता येत नाही. अशा या वारंवारच्या कटकटीमुळे शेतकरी शेताच्या सभोवती तार टाकून त्यात विद्युत प्रवाह सोडण्याच्या भानगडीत पडतो आणि मग काही दुर्घटना झाल्यास इतरांचे व स्वत:चे संपूर्ण आयुष्याने वाटोळे करून घेतो. तारेतून विद्युत प्रवाह सोडून आपल्या मालमत्तेला सुरक्षित ठेवण्याच्या या शेतकर्‍यांच्या संकल्पेनवर विचार करून शास्त्रज्ञांनी आता निर्धोक सौर कुंपण शोधून काढले आहे.

सौर कुंपण म्हणजे काय?

सौर कुंपण हे काही वेगळे कुंपण नूसन विद्युत प्रवाहीत तारेचे कुंपण आहे. त्यात फरक फक्त एवढाच की, या कुंपणात सौर ऊर्जेपासून तयार विद्युत, प्रवाह सोडण्यात येतो. परंतु अशा प्रकारच्या कुंपणाने (विद्युत प्रवाह असलेल्या कुंपणाने) जिवीतहानी होत नाही. या कुंपणाच्या सान्निध्यात गुरे, ढोरे, चोर किंवा इतर कोणतेही प्राणी आल्यास त्यांना जोराचा विजेचा झटका बसून ते कुंपणापासून दूर फेकले जातात. या कुंपणाचा विद्युत आघात असा असतो की एकदा, अनुभवल्यास कुणीही पुन्हा त्या कुंपणाजवळ जाण्याचे धाडस करत नाही. हे कुंपण 24 तास बॅटरीच्या सहाय्याने कार्य करत असते.

सौर कुंपणाचे आवश्यक घटक

सौर कुंपण या पद्धतीला मुख्यत : चार घटकांची आवश्यकता असते. त्यामध्ये प्रामुख्याने सौर पॅनल, बॅटरी, प्रवाहयुक्त तार, नियंत्रक, सौर पॅनल, असंख्य सोलर सेल एका अशी जोडणी करून सोलर पॅनल तयार केले जाते जे कुंपणात प्रवाह पाठविण्यास मदत करते. आपल्याला आवश्यक कार्यक्षमतेनुसार आपण सौर पॅनलची निवड करू शकतो. मुख्यत: या  पद्धतीत आपल्याला जास्त व्होल्टेजची व एकसारखा विद्युत सप्लायची आवश्यकता असते. त्यामुळे आपण वापरात घेतलेले पॅनल सीरीजमध्ये जोडतो.

जेव्हा एखादी व्यक्ती किंवा प्राणी त्या तारेच्या संपर्कात येतात जेव्हा संपूर्ण सर्कीट तयार होऊन त्या प्राण्याच्या शरीरातून वाहून नियंत्रकाकडे जातो व एकदम जास्त व्होल्टेज तयार होते व संपर्कात आलेल्या व्यक्तीला एकदम जोरदार धक्का बसून बाजूला फेकला जातो.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]