शेतकरी नेते भाजपचे माजी आमदार तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांना पुत्रशोक झाला असून, यांचे पुत्र ॲड. हसन पाशा पटेल यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 38 वर्षी वयाचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लातूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
मोठी बातमी : पावसाळी अधिवेशनात झाले 10 विधेयके मंजूर व 26 महत्त्वापूर्ण निर्णय
लातूर येथील एका खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसापासून त्यांची मूत्यूशी सुरु असलेली झुंज आज संपली. पाशा पटेल यांचे मूळगाव असलेल्या औसा तालुक्यातील लोदगा येथे आज दुपारी दोनच्या सुमारास ॲड. हसन पटेल यांच्यावर फिनिक्स शैक्षणिक संकुलाच्या शेजारी दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई-वडिल आणि दोन भाऊ असा परिवार आहे. अॅड. हसन पटेल पटेल यांचे कमी वयात निधन झाल्याने सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
पाशा पटेल हे राजकारणात असले तरी त्यांचे पुत्र अॅड. हसन पटेल मात्र राजकारणापासून कायमच दूर होते. ते मागील काही वर्षांपासून मुंबई हायकोर्टात वकिली करत होते. लॉकडाऊनमध्ये ते लातूरमध्ये आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने ते लातूरमध्येच वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर लातूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्त्वाची माहिती : आज बैल पोळा, सर्जाराजाचा सण
पाशा पटेल हे शेतकरी नेते असून ते भाजपचे माजी आमदार देखील राहिलेले आहेत. ते शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा आवाज उठवला. त्यांनी अनेक आंदोलने केली. पाशा पटेल हे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत कार्यरत होते. या संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेल्या पाशा पटेल यांना त्यावेळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षात आणले. शेतकरी चळवळीतील भाजपचा मुस्लिम चेहरा दाखवण्यासाठी त्यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र मुंडे यांच्या निधनानंतर बहुजन, अल्पसंख्यांक समाजात भाजपचे काम वाढवण्याचा प्रयत्न करणारे पाशा पटेल यांना भाजपने सध्या अडगळीत टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मोठी बातमी : कृषी सहायकांच्या रिक्त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा : 1757 पदे रिक्त
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1