राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांची वर्णी लागली आहे. साखर कारखानदारीतील मोठा अनुभव असलेले पाटील हे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या संचालक मंडळापासून ते आजअखेर 54 वर्षे संचालक आहेत, तर गेल्या 30 वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
मोठा निर्णय : पुढील हंगामापासून उसाचा काटा होणार डिजिटल !
दोन वर्षांपूर्वी पी. आर. पाटील यांचा कुरळप जन्मगावी वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी पवार यांनी पाटील यांच्या साखर कारखानदारीतील अनुभवाचा फायदा राज्याला देण्यासाठी राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड करीत असल्याचे जाहीर केले होते. यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडून पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
हे नक्की वाचा : महावितरणला कंटाळून शेतकऱ्याची संत्रा बागेवर कुऱ्हाड
साखर उद्योगातील जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून पी. आर. पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी साखर उद्योगातील अनेक कामे मार्गी लावली असून, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी, अर्कशाळा प्रकल्पाचा विस्तार आणि आधुनिकीकरण अशा सर्व कामांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.
महत्त्वाची बातमी : परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या या तीन वाणास राष्ट्रीय मान्यता
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1